23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामाइसिसला भाजपा कार्यालये आणि हिंदू नेत्यांना करायचे होते लक्ष्य

इसिसला भाजपा कार्यालये आणि हिंदू नेत्यांना करायचे होते लक्ष्य

छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आलेल्या जोहेबकडून धक्कादायक खुलासे

Google News Follow

Related

राष्ट्रीय तपास यंत्रणेने म्हणजेच एनआयएने छत्रपती संभाजीनगर येथून एका व्यक्तीला अटक केली होती. मोहम्मद जोहेब असे त्याचे नाव असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. त्याच्या चौकशीतून काही धक्कादायक खुलासे झाले आहेत. इसिस या दहशतवादी संघटनेकडून देशातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयांवर हल्ला करण्याचा प्लान होता अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच इसिसचा हिंदू नेत्यांच्या हत्येचा देखील प्लान होता, असं देखील जोहेबने सांगितलं आहे. ‘द फ्री प्रेस जर्नल’ने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

छत्रपती संभाजीनगरमधील भाजपा कार्यालयासह संपूर्ण देशातील भाजपा कार्यालयावरती हल्ला करण्याचा इसिसचा प्लान ठरला होता. तसेच देशातील काही मोठ्या हिंदू नेत्यांच्या हत्येचादेखील कट रचण्यात आला होता, अशी धक्कादायक माहिती तपासातून उघड झाली आहे. त्यासाठी मोहम्मद जोहेब याला एक सिम कार्ड देखील पुरवण्यात आलं होतं आणि त्याच माध्यमातून टेलिग्राम लिंकच्या द्वारे त्याच्याशी संवाद साधण्यात येत होता.

याशिवाय त्याला पिस्तुल, स्फोटके पुरवली जात होती. देशभरात दहशत पसरवण्याचा देखील प्लान होता, अशी माहिती समोर आली आहे. मोहम्मद जोहेब याच्या चौकशीतून ही धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे.

हे ही वाचा:

भारतीय संघावर सुनील गावस्कर यांची टीका

पुणे पोलिसांकडून ४ हजार कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त

मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा

कॉंग्रेसच्या अल्पसख्यांक विभागाला सर्वाधिक देणगी

राष्ट्रीय तपास यंत्रणेने जोहेबला छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली होती. एनआयएकडून काही ठिकाणी छापेमारी सुरू असताना ही अटक झाली होती. पुढे त्याची कसून चौकशी करण्यात आली असता, बरीच धक्कादायक माहिती हाती लागली आहे. हल्ल्यासाठी पिस्तुल, स्फोटकं, सिम कार्ड उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती जोहेबने दिली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा