भाजपच्या बड्या नेत्यावरील हल्ल्याच्या तयारीतला दहशतवादी रशियात पकडला

भाजपच्या बड्या नेत्यावरील हल्ल्याच्या तयारीतला दहशतवादी रशियात पकडला

रशियन सुरक्षा एजन्सीने आयएसआयएस या दहशतवादी संघटनेशी संबंधित एका दहशतवाद्याला ताब्यात घेतले आहे. त्या दहशतवाद्याच्या चौकशीतून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या दहशतवाद्याने भारतातील एका बड्या नेत्यावर आत्मघातकी हल्ला करण्याच्या कट रचला होता, असा खुलासा केला आहे.

रशियन न्यूज एजन्सी स्पुतनिकमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ‘एफएसबीने रशियामध्ये प्रतिबंधित दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट (ISIS) च्या आंतरराष्ट्रीय युनिटच्या सदस्याची ओळख पटवली आणि त्याला लगेच पकडले. हा दहशतवादी मध्य आशियातील कोणत्यातरी देशाचा रहिवासी आहे. जो भारतातील एका मोठ्या नेत्यावर हल्ला करण्याच्या तयारीत होता. रशियन एजन्सीच्या निवेदनात असेही म्हटले आहे की ताब्यात घेतलेला दहशतवादी तुर्कीमध्ये आत्मघाती बॉम्बर म्हणून भरती झाला होता.

हे ही वाचा:

‘महाकाल थाली’च्या जाहिरातीवरून ‘झोमॅटो’ने मागितली माफी

‘मेटेंची गाडी ओव्हरेटक करताना ड्रायव्हरचं जजमेंट चुकलं आणि अपघात झाला’

संजय राऊतांचा तुरुंगातील मुक्काम वाढला

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी लांबणीवर

‘भारतीय एजन्सी रशियाच्या संपर्कात’

रशियन एजन्सी या आत्मघातकी हल्लेखोराचा सतत तपास करत आहेत. भारतीय एजन्सी या प्रकरणातील नवीन माहितीचाही शोध घेत आहेत. हा दहशतवादी ज्या भाजपा नेत्याला लक्ष्य करणार होता त्या नेत्याचे नाव समोर आलेले नाही. जगातील अनेक देशांप्रमाणे, इस्लामिक स्टेट ही भारतातील प्रतिबंधित दहशतवादी संघटना आहे, तिच्या सर्व युनिट्सच्या कारवाया दहशतवादी कारवायांच्या कक्षेत येतात. सध्या, भारतीय एजन्सी आणि केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मते, दहशतवादी संघटना आयएसआयएस आपली विचारधारा पसरवण्यासाठी इंटरनेट-आधारित सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरत आहे. या संदर्भात भारतीय एजन्सी सायबर स्पेसवर बारीक लक्ष ठेवून आहेत आणि कायद्याच्या कक्षेत सतत कारवाई केली जात आहे.

Exit mobile version