26 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरक्राईमनामासंभाजीनगरमध्ये ‘इसिस’चे जाळे; ५० हून अधिक विद्यार्थी ‘व्हॉट्सऍप ग्रुप’ मॉडेलमध्ये अडकले

संभाजीनगरमध्ये ‘इसिस’चे जाळे; ५० हून अधिक विद्यार्थी ‘व्हॉट्सऍप ग्रुप’ मॉडेलमध्ये अडकले

‘एनआयए’ने दाखल केलेल्या आरोपपत्रातून धक्कादायक खुलासे

Google News Follow

Related

राष्ट्रीय तपास संस्थेने म्हणजेचे ‘एनआयए’ने १२ फेब्रुवारी २०२४ रोजी छत्रपती संभाजीनगरमधील हसूल परिसरातून मोहमद जोएब खानला याला अटक केली होती. त्याच्याविरोधात शुक्रवारी मुंबईतील एनआयएच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यातून छत्रपती संभाजीनगरातून सुरू असलेल्या इसिसच्या कारवायांची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मोहम्मद जोएब खान आणि लिबियन एम. शोएब खान यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमधील एका मॉड्यूलशी इसिसच्या जागतिक नेटवर्कशी संबंधीत दहशतवादी कटातील प्रमुख सूत्रधार म्हणून गुन्हा दाखल केला आहे. भारतात इसिसीच्या नापाक कारवाया पुढे नेण्यासाठी आणि कट्टरपंथीय बनवण्याच्या उद्देशाने जोएबने छत्रपती संभाजीनगरमधील ५० हून अधिक तरुणांना घेऊन एक व्हॉट्सऍप ग्रुप तयार केला होता, असे तपासात आढळून आले आहे.

जगभरात इसिसचे जाळे पसरवणारा मोहम्मद शोएब खान याने आयटी इंजिनिअर असलेल्या जोएबची भरती केली होती. जोएब त्याच्यासाठी स्लिपरसेल म्हणून काम करत होता. देशातील संवेदनशील ठिकाणांवर हल्ला करण्यासाठी जोएबच्या मदतीने शोएबने माथेफिरू तरुणांची टोळी तयार केली होती. भारतात मोठ्या घातपाती कारवाया करून अफगाणिस्तान किंवा तुर्कियेत पळून जाण्याचा कट रचण्यात आला होता. लिबियाचा शोएब आणि छत्रपती संभाजीनगरातील जोएब या कटाचे मुख्य सूत्रधार होते, एनआयएच्या आरोपपत्रात म्हटले आहे.

हे ही वाचा:

महायुतीच महाराष्ट्रात सरकार बनवणार

काँग्रेसची ५ मतं अजित पवार गटाने फोडली?, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मानले आभार!

कर्नाटक सरकारकडे विकासकामांसाठी पैसा नाही

मदरशातील विद्यार्थ्यांना सरकारी शाळेत पाठवा !

छत्रपती संभाजीनगरमधील मोहम्मद जोएब खान हा बेरीबाग परिसर राहत होता. पूर्वी तो बंगळूरूमध्ये वेब डेव्हलपर म्हणून चांगल्या पदावर आणि चांगल्या पगारावर कामाला होता. पुढे तो दहशतवादाकडे वळला. इसिसशी त्याचे संबंध होते. अखेर एनआयएने त्याच्या मुसक्या आवळल्या आणि हा कट समोर आला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा