पंतप्रधान मोदींवर आत्मघातकी हल्ल्याचा कट

गुप्तचर यंत्रणांनी दिला अलर्ट

पंतप्रधान मोदींवर आत्मघातकी हल्ल्याचा कट

दिवाळीपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेबाबत गुप्तचर यंत्रणांनी मोठा अलर्ट जारी केला आहे. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या निशाण्यावर असल्याचं म्हटलं आहे. दहशतवाद्यांकडून पंतप्रधान मोदींवर आत्मघाती हल्ला करण्याची योजना आखली जात आहे. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयने पंतप्रधान मोदींवर हल्ला करण्यासाठी लष्कर-ए-तैयबाला हे काम सोपवले आहे. गुप्तचर यंत्रणांच्या कागदपत्रांवरून हे उघड झाले आहे.

कोणत्याही रॅली किंवा कार्यक्रमादरम्यान हे दहशतवादी पंतप्रधान मोदींना लक्ष्य करू शकतात, असा दावा गुप्तचर यंत्रणांनी केला आहे. हे दहशतवादी रॅली किंवा रोड शोमध्ये पोलिसांच्या गणवेशात एन्ट्री घेऊ शकतात. गुप्तचर कागदपत्रांचा हवाला देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात आत्मघाती हल्ला करण्याचा कट रचला जात असल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या गणवेशातही दहशतवादी पीएम मोदींच्या कार्यक्रमस्थळी आत्मघाती हल्ला करू शकतात, असा दावा करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

पीएफआयला राम मंदिर पाडून बाबरी मस्जिद बांधायची होती

पूजा चव्हाणसाठी मी लढत असताना भास्करशेठ तुम्ही कुठल्या बिळात लपला होतात?

रॉजर बिन्नी बीसीसीआयचे नवे अध्यक्ष

पाऊस पुण्यात पुणे पाण्यात

लष्कराचे दहशतवादी काही सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या संपर्कातही आहेत. मात्र, भारतीय सुरक्षा दलांना आयएसआयच्या दहशतवादी मनसुब्यांची माहिती मिळाली असून, हा इशारा पाहता सर्वांनाच धक्का बसला आहे. पंतप्रधान मोदी पुढील एक आठवडा गुजरात, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. त्याचवेळी हा अलर्ट जारी झाला आहे. पीएम मोदींच्या कार्यक्रमांमध्ये आतापर्यंत कोणताही बदल होण्याची चिन्हे दिसत नाहीत.

पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयने लष्करला भारतातील सर्व बड्या नेत्यांना आपल्या निशाण्यावर घेण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये सर्वात मोठे नाव पीएम मोदींचे आहे. पोलिसांच्या गणवेशातील हे दहशतवादी पीएम मोदींवर आत्मघाती हल्ला करू शकतात, असं म्हटल्या जात आहे. या अलर्टनंतर पीएम मोदींची सुरक्षा वाढू शकते असे मानले जात आहे.

Exit mobile version