मुंबईत बॉम्ब स्फोट होणार आहे?

निनावी कॉल मुळे खळबळ, एकाला धारावीतून अटक

मुंबईत बॉम्ब स्फोट होणार आहे?

मुंबई : थर्टीफर्स्ट च्या रात्री मुंबईत चार ठिकाणी बॉम्बस्फोट होणार असल्याच्या निनावी कॉलमुळे मुंबईत एकच खळबळ उडाली होती. मात्र हा केवळ अफवेचा कॉल असल्याचे समोर येताच पोलिसांचा जीव भांड्यात पडला आहे. कॉल करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन धारावी पोलीसानी धमकी देणाऱ्या इसमाला धारावीतून ताब्यात घेऊन आझाद मैदान पोलिसांकडे सोपवले आहे.भावासोबत झालेल्या भांडणातून त्याने दारूच्या नशेत हे कृत्य केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

नरेंद्र कवळे (३८)असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून धारावी येथे कुटुंबासह राहणारा नरेंद्र हा ओला कॅब चालक आहे. गुरुवारी रात्री मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला अज्ञात व्यक्तीने फोन करून “मुंबईत ३० आणि ३१ डिसेंबर रोजी तीन-चार ठीकाणी बॉम्ब स्फोट होणार आहेत,अजहर हुसैन, आझमगड, उत्तर प्रदेष, येथुन निघाला आहे, त्याच्याकडे तीन-चार हत्यारे आहेत, आर. डी. एक्स आहे, तो धारावीतील राजीव गांधी नगर, धारावी, ओ.एन.जी.सी. गेट समोर याठीकाणी राहतो” असे सांगुन कॉल बंद केला.
मुख्य नियंत्रण कक्षाकडून याप्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून आलेल्या मोबाईल क्रमांकाची माहिती काढण्यात आली असता कॉल करणारी व्यक्ती धारावी परिसरात राहण्यास असल्याची माहिती समोर आली. धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कांदळगावकर यांनी या व्यक्तीच्या शोधासाठी पोलीस पथक पाठवुन शुक्रवारी रात्री नरेंद्र कवळे याला ताब्यात घेण्यात आले.

हेही वाचा :

शिझान खानला १४ दिवसांची  न्यायालयीन कोठडी

राहुल गांधी बीजेपी,आरएसएसला गुरु मानतात तर नागपूरमध्ये जाऊन नतमस्तक व्हावे

चंदा कोचर यांचा ‘पद्म’ पुरस्कार काढून घेणार का? 

त्याच्याकडे चौकशी केली असता “मोठ्या भावासोबत भांडण झाले,भावाने मारल्यामुळे मी दारू प्यायलो, त्यानंतर धारावीतील गुन्हेगारीवृत्तीचा अझहर हुसेन याला अद्दल घडविण्यासाठी दारूच्या नशेत कंट्रोलला कॉल केला अशी माहिती त्याने पोलिसांना दिली.धारावी पोलीसानी नरेंद्र कवळे याला आझाद मैदान पोलिसांच्या ताब्यात दिले. आझाद मैदान पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Exit mobile version