आर्यन खानचे काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी

आर्यन खानचे काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी

क्रूज ड्रग्स पार्टी प्रकरणात तुरुंगात असलेला अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या जामिनावर आता शुक्रवारी म्हणजेच २० तारखेला निर्णय घेण्यात येणार आहे. एनसीबीच्या विशेष न्यायालयाने आर्यनच्या जामिनावर सुनावणी केल्यानंतर निकाल आता राखून ठेवला आहे. न्यायालय आपला निर्णय शुक्रवारी देणार आहे. त्यानंतर हे स्पष्ट होईल की, आर्यन खानचा मुक्काम लांबणार की संपणार?

आर्यनला ३ ऑक्टोबर २०२१ रोजी अटक करण्यात आली. सध्या तो न्यायालयीन कोठडीत असून त्याला भायखळा येथील आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात आले आहे. यापूर्वी दंडाधिकारी न्यायालयाने आर्यनला जामीन नाकारला होता. त्यामुळे आर्यनने विशेष न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे.

आर्यनच्या वतीने वरिष्ठ वकील अमित देसाई न्यायालयात हजर झाले होते. एनसीबीच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी आपली बाजू मांडली होती. न्यायालयीन सुनावणी दरम्यान, सिंह यांनी आर्यनच्या जामिनाला विरोध केला होता, असा दावा केला होता की आर्यन अशा लोकांच्या संपर्कात होता जे आंतरराष्ट्रीय स्तरावर औषधे खरेदीशी संबंधित तस्करीचा भाग आहेत. त्याला जामीन मिळाला तर पुरावे नष्ट होण्याचा धोका असेल असे मत त्यांनी मांडले.

 

हे ही वाचा:

हाताला मिळणार महिलांची साथ? उत्तर प्रदेशात देणार ४०% महिला उमेदवार

उल्हासनगरमध्ये लोक छत्री घेऊन जात आहेत शौचालयात… वाचा काय आहे कारण?

‘स्क्विड गेम’मुळे का झाले पाकिस्तानी नाराज?

कोजागिरी पौर्णिमा म्हणजे काय? कशी करावी कोजागिरी ?

 

तपासादरम्यान प्रथमदर्शनी याचे संकेत मिळाले आहेत. या पैलूची तपशीलवार तपासणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे आरोपीला जामीन देऊ नये. तपास अद्यापही प्राथमिक टप्प्यात आहे, त्यामुळेच आरोपीला जामीन देऊ नये. आर्यनची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील देसाई यांनी दावा केला होता की, आर्यनचा या प्रकरणात कुठलीही गूढ भूमिका नाही, त्यामुळे कायद्यानुसार आता त्याला जामीन मिळायलाच हवा.

Exit mobile version