इक्बाल कासकरची १५ तास कसून चौकशी

इक्बाल कासकरची १५ तास कसून चौकशी

गुन्हेगारी जगतातीत डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर याची १५ तास कसून चौकशी केल्यानंतर शनिवारी पुन्हा त्याची रवानगी ठाणे कारागृहात करण्यात आली आहे. इक्बाल कासकर याला शुक्रवारी सकाळी एनसीबीने ड्रग्स प्रकरणात चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

एनसीबीकडून गेल्या आठवड्यात चरस या अमली पदार्थासह अटक करण्यात आली होती. अटक करण्यात आलेले दोघेही पंजाब प्रातांतील असून त्यांनी जम्मू येथून मोटारसायकवरून मुंबईत चरस आणले होते. या दोघांच्या चौकशीत दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याचे नाव आले होते. इक्बाल हा मागील तीन वर्षांपासून ठाणे कारागृहात असून त्याच्याकडे या संदर्भात चौकशी करण्यासाठी एनसीबीने न्यायालयाकडे त्याचा ताबा मागितला होता.

इक्बाल कासकर याला एका दिवसाची एनसीबी कोठडीचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर शुक्रवारी एनसीबीने इक्बाल कासकर याचा ठाणे कारागृहातून ताबा मिळवला होता. ताबा मिळताच त्याची एनसीबीच्या अधिकार्‍यांनी तब्बल पंधरा तास चौकशी केली. या चौकशीत इक्बालने २००७ रोजी शब्बीरला भेटल्याची कबुली दिली. त्यानंतर ते दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते, मात्र त्याच्याकडून ड्रग्ज घेतल्याचा इक्बालने इन्कार केला. चौकशीनंतर इक्बाल कडेकोट पोलीस बंदोबस्तात पुन्हा ठाणे कारागृहात नेण्यात आले. गरज पडल्यास पुन्हा इक्बालची चौकशी होऊ शकते असे एका अधिकार्‍याने बोलताना सांगितले.

आज आंतरराष्ट्रीय अमली पदार्थविरोधी दिन जगभरात पाळला जातो. या क्षेत्रातील गुन्हेगारी साखळी मोडून काढण्याचा चंग राष्ट्रीय अमलीपदार्थ विरोधी विभागाने केला आहे. अशा अनेक टोळ्या गेल्या काही महिन्यात एनसीबीने उघड केल्या आहेत.

Exit mobile version