मंगळवार, १५ फेब्रुवारी रोजी मुंबईत दहा ठिकाणी ईडीने छापे टाकले. अंडरवर्ल्ड डॉन कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिच्या घरी देखील ईडीने छापे मारले होते. आता अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याचा भाऊ इक्बाल कासकर याला ईडीकडून अटक होण्याची शक्यता आहे. ईडीने न्यायालयात त्याची कस्टडी मिळवण्यासाठी अर्ज केला आहे.
ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने २०१७ मध्ये त्याच्यावर खंडणीच्या तीन गुन्ह्यांची नोंद केल्यानंतर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मकोका) गुन्हा दाखल झाल्यानंतर इक्बाल कासकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. मनी लाँडरिंग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ईडीने इक्बाल कासकर याची कस्टडी मागितली आहे. याप्रकरणी ईडीने चार ते पाच जणांची चौकशी केली आहे. तसेच आणखी काही जणांची चौकशी केली जाणार आहे.
हे ही वाचा:
अजित डोभाल यांच्या घरात शिरली एक अज्ञात व्यक्ती
संत रविदास जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी भजनात रमले
मोहित कंबोज म्हणतात, म्हणून संजय राऊत यांना घाम फुटला!
‘२५ हजार कोटींचा घोटाळा झाला म्हणताय, मग तुम्ही काय दोन वर्ष झोपला होता का?’
छोटा शकीलचा जवळचा साथीदार सलीम कुरेशी ऊर्फ सलीम फ्रुट याची ईडीने मंगळवारी नऊ तास चौकशी केली. आज त्याला पुन्हा कागदपत्रे घेऊन चौकशीसाठी बोलावण्यात आले. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित काही जागांवर ईडीने मंगळवारी सकाळी मुंबईतील विविध दहा च्हापेमारी केली. ईडीने दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर हिच्या घराचीही झडती घेतली.