गावात आणि समाजात रुबाब दाखवण्यासाठी २४ वर्षांचा युवक तोतया आयपीएस अधिकारी झाला. इतकेच नव्हे तर आयपीएस अधिकारी झाल्याने त्याचा गावात तसेच, पोलिस अधिकाऱ्यांनी मोठा सन्मान केला. या दरम्यान त्याचा साखरपुडाही झाला. मात्र अखेर त्याचे बिंग फुटले. शनिवारी उदयपूर पोलिसांनी या तोतया आयपीएसला अखेर अटक केली आहे. बानसूरचा हा तरुण गेल्या दीड वर्षांपासून तोतया आयपीएस अधिकारी होऊन सर्वांना मूर्ख बनवत होता. मात्र एका छोट्या चुकीमुळे त्याचे बिंग फुटले.
जेव्हा हा तरुण त्याचा भावी मेहुणा आणि समाजातील पदाधिकाऱ्यांसोबत उदयपूर फिरायला आला तेव्हा सर्किट हाऊसच्या एका मॅनेजरसमोर केलेली चूक त्याला भलतीच महागात पडली. जेव्हा मॅनेजरला संशय आला तेव्हा त्याने लगेचच पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिसांनी त्याला सॅल्युट करायला सांगितले. जेव्हा त्याने उलट्या हाताने सॅल्युट मारले, तेव्हा त्याची चूक लगेचच पकडली गेली. त्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली आणि त्याचे फेसबुक अकाऊंट तपासले. तेव्हा त्याला कळले की, त्याने अनेक यूट्यूब चॅनेलला खोट्या मुलाखतीही दिल्या आहेत.
हे ही वाचा:
काशी विश्वनाथ मंदिरासह नागर शैलीत साकारले आहे ज्ञानवापी!
हुती दहशतवाद्यांकडून मालवाहू जहाजावर क्षेपणास्त्रहल्ला!
जल्लोषाला किंतु-परंतु जे गोलबोट…
मराठी भाषा सर्वांना एकत्रित ठेवणारा समान धागा..!
पोलिसांनी बानसूरच्या हाजीपूरचा राहणारा तोतया आयपीएस सुनील सांखला याच्यासह इंदाज सैनी, अमित चौहान आणि सत्यनारायण कनोलिया यांनाही अटक केली आहे. सुनीलने स्वतः आयपीएस अधिकारी बनल्याचे सांगितले होते. तसेच, तो महाराष्ट्र केडरचा आयपीएस अधिकारी असून त्याची नियुक्ती मुंबईला झाल्याचे तो सांगत असे. सुनीलने सन २०२०मध्ये आयपीएसची तयारीही केली होती, मात्र त्याची निवड झाली नाही. त्याने त्याचा २६३वा रँक आल्याचे सांगितले होते. तसेच, त्याने तत्पूर्वी राजस्थान पोलिस आणि इन्कम टॅक्स कार्यालयात क्लार्कची नोकरी लागल्याचेही सांगितले होते. मात्र असे काहीही नव्हते.