36 C
Mumbai
Saturday, April 5, 2025
घरक्राईमनामामहाराष्ट्रातील आयपीएस अधिकारी सुधाकर पठारे यांचे तेलंगणात अपघाती निधन

महाराष्ट्रातील आयपीएस अधिकारी सुधाकर पठारे यांचे तेलंगणात अपघाती निधन

Google News Follow

Related

आयपीएस सुधाकर पठारे यांचे अपघाती निधन झालं आहे. तेलंगणातील श्रीशैलम येथून ते नागरकुरलूनकडे जात असताना त्यांच्या कारचा अपघात झाला आणि त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. सुधाकर पठारे हे ज्या गाडीतून प्रवास करत होते त्या गाडीची ट्रकसोबत धडक झाली आणि हा अपघात झाला.

सुधाकर पठारे हे २०११ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सुधाकर पठारे यांच्या अपघातामुळे महाराष्ट्र पोलिस दलावर शोककळा पसरली आहे.

सुधाकर पठारे सध्या मुंबई पोलिसमध्ये पोर्ट झोनचे डीसीपी म्हणून कार्यरत होते. सुधाकर पठारे हे ट्रेनिंगसाठी हैदराबादमध्ये गेले होते. त्या ठिकाणी त्यांच्या एका नातेवाईकासह ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी जात असता हा अपघात झाला. या अपघातात सुधाकर पठारे यांच्यासोबत त्यांच्या नातेवाईकाचाही मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेची माहिती तेलंगणा पोलिसांना मुंबई पोलिसांना कळवली आहे.

हे ही वाचा:

“कठीण काळात म्यानमारच्या लोकांसोबत भारत एकजुटीने उभा”

“सुरक्षा दलाच्या शौर्यामुळे मार्च २०२६ पर्यंत नक्षलवादाचे उच्चाटन करणार!”

आशीष सूद यांचा अरविंद केजरीवालांवर पलटवार

सीएसकेला आरसीबीने १७ वर्षांनंतर दिला दणका

स्पर्धा परीक्षा देत असताना १९९५ साली ते जिल्हा विशेष लेखा परीक्षक झाले. यानंतर १९९६ साली विक्रीकर अधिकारी वर्ग १ म्हणून त्यांची निवड झाली. १९९८ साली पोलिस उपअधीक्षक म्हणून त्यांची निवड झाल्यानंतर पोलिस खात्यातच ते रमले. आतापर्यंत त्यांनी पोलिस उपअधीक्षक म्हणून पंढरपूर, अकलूज, कोल्हापूर शहर, राजुरा येथे सेवा बजावली आहे.

राज्यात अनेक ठिकाणी सेवा बजावली

अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून चंद्रपूर, वसई तर पोलिस अधीक्षक म्हणून सीआयडी अमरावती येथे सेवा बजावली आहे. पोलिस उपायुक्त म्हणून मुंबई, ठाणे, पुणे, वाशी, नवी मुंबई, ठाणे शहर येथे सेवा बजावली आहे. एसपी डॉ. सुधाकर पठारे यांनी पोलिस खात्यात सेवा बजावताना संघटित गुन्हेगारी (मोक्का), तडीपारी, एमपीडीए अशा प्रतिबंधात्मक कारवाईंचा धडाका लावला होता. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच त्यांनी पोलिस दलात अनेक विविध उपक्रम राबवले आहेत.

सुधाकर पठारे यांच्या निधनामुळे महाराष्ट्र पोलिस दलावर शोककळा पसरली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
240,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा