उद्धव ठाकरेंच्या बेहिशेबी मालमत्तेची चौकशी सुरु

याबाबत आज न्यायालयात सुनावणी पार पडली

उद्धव ठाकरेंच्या बेहिशेबी मालमत्तेची चौकशी सुरु

उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या संपत्तीची चौकशी व्हावी, अशी मागणी काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयात करण्यात आली होती. या याचिकेवर आज, ८ डिसेंबर रोजी सुनावणी पार पडली आहे.

दादरमधील रहिवासी गौरी भिडे आणि त्यांचे वडील अभय भिडे यांनी ठाकरे कुटुंबियांच्या बेहिशोबी मालमत्तेसंदर्भात याचिका दाखल केली होती. ठाकरे कुटुंबियांचे उत्पन्न आणि त्यांची संपत्ती याचा ताळमेळ लागत नसल्याने याप्रकरणाची सीबीआय आणि ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली होती. भिडे यांनी मुंबई पोलिसांत तक्रार दिली होती मात्र, काही कारवाई झाली नाही. त्यामुळे याचिका केली असल्याचा दावा भिडे यांनी केला आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार, सीबीआय, ईडीसह उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य आणि तेजस ठाकरे यांनाही याचिकेत प्रतिवादी करण्यात आले होते.

याबाबत आज न्यायालयात सुनावणी पार पडली आहे. याबाबत रीतसर चौकशीची मागणी करणारे पत्र आमच्याकडे आले. त्याची दखल घेत प्राथमिक चौकशी सुरू असल्याची माहिती सरकारी वकिलांनी उच्च न्यायालयात दिली आहे.

हे ही वाचा :

गुजरातमध्ये हे जिंकले, हे हरले

मोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास; पण ‘आप’ला जनतेने त्यांना पूर्ण नाकारले

आपचा गुजरातमध्ये भाजपाला नाही तर काँग्रेसला फटका

…आणि सात वर्षांनंतर मृत महिला परतली

मात्र, गौरी भिडे यांची याचिका सुनावणीसाठी घ्यायची की नाही यासंदर्भात न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. त्यासोबतच ठाकरे यांनी या याचिकेवर आक्षेप घेतला आहे. तर ही याचिका राजकीय वैमनस्यातून दाखल केली असल्याचा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला आहे. मात्र तरीही मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने ठाकरे कुटुंबाच्या संपत्तीची चौकशी सुरू केली आहे.

Exit mobile version