25 C
Mumbai
Wednesday, November 27, 2024
घरक्राईमनामाइन्स्टाग्रामवर झाली ओळख अन् साडेसहा लाखाला घातला गंडा !

इन्स्टाग्रामवर झाली ओळख अन् साडेसहा लाखाला घातला गंडा !

ऑनलाईन माध्यमातून महिलेसह १० जणांची फसवणूक

Google News Follow

Related

ऑनलाईन फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. दरम्यान, डोबिंवलीतही अशीच एक फसवणूकीची घटना घडली आहे. एका व्यक्तीने इंस्टाग्रामवर ओळख निर्माण करत डोंबिवलीतील एका महिलेसह १० जणांना ऑनलाईन माध्यमातून महिलेसह इतरांची ६ लाख ५४ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. त्यामुळेच एकाच खळबळ उडाली.

 

सध्याच्या धावत्या युगात पैसे मिळवण्यासाठी माणसे धडपडत असतात.अधिक पैसे मिळवण्याच्या हेतूने ठिकठिकाणी पैसे जमा करत असतात.मात्र, पैसे गुंतविण्याच्या बाबतीत अधिक जागरुक असणे गरजेचे आहे. त्यात हयगय झाली तर त्याचा फटका बसतो. अशाच एका व्यक्तीला तब्बल ६ लाख ५४ हजारांचा गंडा घातला गेला आहे. डोंबिवलीत ही घटना घडली.

 

बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केल्यास आपणास आकर्षक परतावा मिळेल, असे डोंबिवलीतील एका महिलेसह इतर १० जणांना सांगून एका अज्ञात व्यक्तीने ऑनलाईन माध्यमातून महिलेसह इतरांची ६ लाख ५४ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. फसवणुकीचा प्रकार गेल्या महिन्याच्या कालावधीत घडला. डोंबिवलीतील नूतन सावंत यांची फसवणूक झाल्या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी भुरट्याविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हे ही वाचा:

जसप्रीत बुमराहचे पुनरागमन; आयर्लंड विरुद्ध भारत टी- २० मालिकेसाठी कर्णधारपदी नियुक्ती

एलपीजी सिलेंडर १०० रुपयांनी स्वस्त

ठाण्यात गर्डर लाँचर कोसळून १७ जणांचा मृत्यू

…तरीही ब्रृजभूषण शरण सिंह कुस्ती महासंघ ताब्यात ठेवण्याच्या तयारीत

 

पोलिसांनी सांगितले की, एका भुरट्याने ऑलीव्हा ४३ या इंस्टाग्रामच्या माध्यमातून तक्रारदार नूतन यांच्याशी संपर्क साधला. बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला अल्पावधीत भरपूर परतावा मिळेल असे सांगितले. अशाप्रकारची माहिती भुरट्याने इतर १० जणांना दिली. अल्पावधीत अधिकची रक्कम गुंतवणुकीवर मिळणार असल्याने ११ गुंतवणूकदारांनी भुरट्याच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन जून, जुलै महिन्याच्या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून गुंतवली.

 

 

फसवणूक झालेल्या नूतन सावंत यांनी आपल्या बँक खात्यामधून ६ लाख ५४ हजार रुपयांची रक्कम भुरट्याने दिलेल्या बँक खात्यात वळती केली. दोन महिने होत आले तरी आकर्षक परतावा मिळत नाही म्हणून तो मिळण्यासाठी गुंतवणूकदारांनी चोराच्या मागे तगादा लावला. त्याने टाळाटाळ सुरू केली. आकर्षक परतावा नसेल तर किमान आमची मूळ किंमत परत करा, अशी मागणी गुंतवणूकदारांनी सुरू केली. त्यालाही चोराने प्रतिसाद देणे बंद केले. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यावर गुंतवणूकदारांनी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

 

अशीच घटना नागपूर मध्ये घडली

नागपुरात ऑनलाईन गेमच्या माध्यमातून एका व्यापाऱ्याची तब्बल ५८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणातील आरोपी हा गोंदियातील होता. अनंत जैन असं आरोपीचं नाव असून तो फरार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पोलिसांनी अनंत जैनच्या गोंदियातील घरी छापा घातल्यानंतर कोट्यवधींची रोख रक्कम जप्त केली आहे. अनंत जैनच्या घरातून आतापर्यंत जवळपास १८ कोटी रुपयांची रोख रक्कम, १५ किलो सोनं आणि २० किलो चांदी जप्त करण्यात आली आहे. आरोपी हा क्रिकेट सट्टेबाज आहे. नागपूरच्या इतिहासातील ऑनलाईन फसवणुकीची ही सर्वात मोठी घटना आहे.आरोपीचा तपास पोलीस घेत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
199,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा