दिल्लीत अमली पदार्थांच्या तस्करीचे रॅकेट उद्ध्वस्त

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जप्त केलेल्या अमली पदार्थाची किंमत सुमारे बाराशे कोटींहून अधिक आहे

दिल्लीत अमली पदार्थांच्या तस्करीचे रॅकेट उद्ध्वस्त

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात मोठे यश मिळाले आहे. स्पेशल सेलने दोन अफगाण नागरिकांना अटक केली असून त्यांच्याकडून त्यांनी ३१२.५ किलो मेथाम्फेटामाइन ड्रग आणि दहा किलो हेरॉईन जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जप्त केलेल्या अमली पदार्थाची किंमत सुमारे बाराशे कोटींहून अधिक आहे.

देशाच्या इतिहासातील मेथॅम्फेटामाइन ड्रग्जचा हा सर्वात मोठा जप्ती आहे. तस्करी करणारे हे दोन्ही अफगाण नागरिक २०१६ पासून भारतात राहत होते. लखनऊ येथील एका गोदामातून ६०६ पोती जप्त करण्यात आल्या आहेत. अंमली पदार्थांची ही खेप आधी चेन्नईहून लखनऊ आणि नंतर तेथून दिल्लीला पाठवण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी सांगितले आहे. जप्त केलेली बॅग अंमली पदार्थांच्या चाचणीसाठी पाठवली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मेथॅम्फेटामाइनची सर्वोत्तम गुणवत्ता प्रति ग्रॅम चारशे डॉलरपर्यंत जाऊ शकते, अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने त्या दोन जणांवर आधीच पाळत ठेवली होती. एका माहितीवरून कालिंदी कुंजजवळून एक कार अडवण्यात आली. यानंतर एका कारमधून मुस्तफा आणि रहीम उल्ला या दोन अफगाण नागरिकांना मेथॅम्फेटामाइनच्या मोठ्या साठ्यासह अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर नोएडा येथूनही हेरॉईन जप्त करण्यात आले असून, मेथॅम्फेटामाइन जप्त करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

थायलंडवासियांची ‘वार्ता आरती’ची पाहिलीत का?

ब्रिटनकडून ‘लगान’ वसूल करण्याची वेळ

ईडी नशा उतरवणार, दिल्लीसह अनेक राज्यात छापेमारी

१४ हजार ५०० शाळांसाठी ‘पीएम श्री स्कुल्स’ स्मार्ट योजनेची घोषणा

मुस्तफा काबुल आणि दुसरा आरोपी रहीम उल्ला हे कंदहारचे असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या ड्रग्जच्या विक्रीतून मिळालेली रक्कम भारताविरोधातील दहशतवादी कारवायांमध्ये वापरली जात होती, अशीही माहिती समोर येत आहे. स्पेशल सेल या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Exit mobile version