कोरोनावरील लस समजून पोलिओच्या लसीवर चोरट्याचा डल्ला 

कोरोनावरील लस समजून पोलिओच्या लसीवर चोरट्याचा डल्ला 

कोरोनाची लस समजून चोरटयांनी पोलिओच्या लसीची चोरी केल्याची घटना ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे घडली. लस चोरीला जाण्याची ही पहिलीच घटना असून याप्रकरणी हिल लाईन पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून चोरट्याचा कसून शोध घेण्यात येत आहे. लसीच्या चोरीमुळे लसीकरण केंद्रातील लसी देखील सुरक्षित नसल्यामुळे आरोग्य विभागात चिंतने वातावरण पसरले आहे.

हे ही वाचा:

१८-४४ वयोगटाला आता लसीसाठी नोंदणीची गरज नाही

राज्यपालांकडे १२ आमदारांची नावं तरी दिलेली आहेत का?

घरच्या घरी कोरोना चाचणी किटची कोटी उड्डाणे

छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या ‘रेनिसन्स स्टेट’ पुस्तकावर बंदी घाला

अंबरनाथ तालुक्यातील मांगरूळ आरोग्य केंद्राच्या खिडक्याच्या लोखंडी ग्रील तोडण्यात आल्याचे सोमवारी सकाळी आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्याच्या लक्षात आले. या कर्मचाऱ्यांनी ही माहिती वरिष्ठांना दिल्यानंतर आरोग्य विभागाचे अधिकारी या केंद्रावर दाखल झाले. त्यांनी आरोग्य केंद्राची पाहणी केली असता या केंद्रात असलेल्या फ्रिज सोबत छेडछाड झाल्याचे लक्षात आले. त्यांनी फ्रिज उघडून बघितला असता फ्रिज मध्ये ठेवण्यात आलेल्या पोलिओच्या लसी दिसून न आल्यामुळे अधिकाऱ्यांनी कर्मचारी यांच्याकडे चौकशी केली. त्यांना याबाबत काहीच कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले.

लस चोरीला गेल्याचे कळताच अधिकाऱ्यांनी हिल लाईन पोलीसाना कळवण्यात आले. पोलिसांनी  घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता केंद्रातील सीसीटीव्हीचा मॉनिटर आणि पोलिसांच्या लसी चोरीला गेल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासण्याचा प्रयत्न केला असता या केंद्रातील सीसीटीव्ही बंद असल्यामुळे या लस कोणी चोरल्या याबाबत कळू शकले नाही.

अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड परिसरातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी मांगरूळ आरोग्य केंद्रात सुरुवात करण्यात आली आहे. या रुग्णालयात दररोज सकाळी बदलापूर येथून कोरोना प्रतिबंधक लसी येत असतात. मात्र, रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास लस रुग्णालयात असतील या आशेने चोरट्यांनी रुग्णालयात प्रवेश केला होता. रुग्णालयात प्रवेश केल्यानंतर रुग्णालयातील फ्रिजमध्ये असलेल्या पोलिओच्या लस चोरट्यांच्या हाती लागल्या आणि त्यांनी त्याच घेऊन रुग्णालयातून पोबारा केला आहे. मात्र, सोमवारी सकाळी आरोग्य केंद्रामधील अधिकाऱ्यांनी रुग्णालयात प्रवेश केला असता, रुग्णालयातील फ्रिजमध्ये पोलिओच्या लसी नसल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी हिल लाईन पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून चोरट्याचा कसून शोध घेण्यात येत आहे

Exit mobile version