कोरोनाऐवजी दिली रेबीजची लस; कळव्यातली धक्कादायक घटना

कोरोनाऐवजी दिली रेबीजची लस; कळव्यातली धक्कादायक घटना

FILE PHOTO: A woman holds a small bottle labelled with a "Coronavirus COVID-19 Vaccine" sticker and a medical syringe in this illustration taken October 30, 2020. REUTERS/Dado Ruvic/File Photo

कोरोनाच्या लसीऐवजी चक्क रेबीजची लस टोचल्याची भयंकर घटना कळव्यात घडली आहे. ठाणे जिल्ह्यातील एका नागरिकाला एका डॉक्टर आणि नर्सने रेबीजवरील लस टोचल्याचे समोर आले आहे.

ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी यासंदर्भात सांगितले आहे की, राजकुमार यादव या कळवा पूर्वेला राहात असलेल्या व्यक्तीने पालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कोव्हिशिल्ड लशीची विचारणा केली. तेथील अधिकारी डॉ. रेखा तावडे यांनी त्यांना कोव्हिशिल्डसंदर्भातील केसपेपर दिले आणि रांगेत उभे राहण्यास सांगितले. या प्राथमिक आरोग्य केंद्रात विविध लसी दिल्या जातात त्यात इतर रोगांवरील लशींचाही समावेश असतो. यादव यांना रांगेत उभे राहण्यास सांगितल्यावर ते रेबीजविरोधी लसीसाठी असलेल्य रांगेत उभे राहिले. पण जेव्हा ते लस घेण्यासाठी गेले तेव्हा नर्स कीर्ती रयात यांनी त्यांच्याकडे असलेली कागदपत्रे तसापली नाहीत शिवाय, या लसीसंदर्भात माहितीही दिली नाही. यादव हे रेबीजविरोधी लसीसाठीच आले आहेत, असा समज करून त्या नर्सने त्यांना तीच लस टोचली.

माळवी म्हणाले की, नर्स व आरोग्य अधिकाऱ्याने यादव यांना कोणती लस टोचली जात आहे, त्याविषयी सांगणे आवश्यक होते शिवाय, त्यांच्याकडे असलेल्या कागदाची तपासणी करायला हवी होती. अशा प्रकारचा निष्काळजीपणा कोणत्याही प्राथमिक आरोग्य केंद्रात सहन केला जाणार नाही. या दोन्ही अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. यादव यांची प्रकृती स्थिर असून ते देखरेखीखाली आहेत.

हे ही वाचा:

मुंबई पुन्हा विजयी ट्रॅकवर

‘भारत तेरे तुकडे होंगे इन्शाअल्लाह’ आता काँग्रेसचे घोषवाक्य असेल

लडाख सीमेवर चीनची पुन्हा लुडबुड सुरू!

शिक्षण विभागातील १० पैकी ९ अधिकारी मुस्लिम

 

लस घेतल्यानंतर यादव यांनी नर्सकडे लशीसंदर्भात विचारणा केली तेव्हा नर्सने सांगितले की, ही रेबीजविरोधी लस आहे. त्यावर यादव घाबरून गेले आणि आपण कोव्हिशिल्ड घेण्यासाठी आल्याचे त्यांनी सांगितले. ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितले की, हे प्राथमिक आरोग्य केंद्र गरीब वस्तीत आहे. तेथील अनेक लोक हे अशिक्षित आहेत, त्यांना मार्गदर्शन करणे हे आरोग्य अधिकाऱ्यांचे काम आहे.

Exit mobile version