सलमान खान धमकी प्रकरणी, सौरभ महाकाळची चौकशी

सलमान खान धमकी प्रकरणी, सौरभ महाकाळची चौकशी

काही दिवसांपूर्वी पंजाबी गायक आणि काँग्रेस नेता सिद्धू मुसेवाला याची हत्या करण्यात आली होती. त्याच्या हत्याकांडाचा तपास सुरु आहे. त्यावेळी सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी पुण्यात सौरभ महाकाळला अटक करण्यात आली आहे. त्यादरम्यान अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना एका चिठ्ठीतून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे महाकाळची सलमान खान धमकी प्रकरणी चौकशी सुरु आहे.

दोन तासापासून महाकाळची सलमान खान धमकी प्रकरणी चौकशी सुरु आहे. मुंबई पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार, पुणे ग्रामीण पोलीसचे अप्पर अधीक्षक मितेश गट्टे याच्याकडून महाकालीची चौकशी सुरु आहे. महाकाळ हा बिष्णोई टोळीचा सदस्य आहे. सौरभ महाकाळ याला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्यांनतर पुणे मोक्का न्यायालयाने त्याला २० जून पर्यंत कोठडी सुनावली आहे. दरम्यान, सलमान खानला धमकी प्रकरणी मुंबई क्राइम ब्रांच पुण्यात दाखल झाले आहे.

हे ही वाचा:

रोजीरोटी देईन, पाणी, रस्ते देईन तेव्हाच संभाजीनगर नाव होईल!

विधानपरिषदेच्या सहाव्या जागेसाठी भाजपाकडून सदाभाऊ खोत

सिद्धू मुसेवाला प्रकरणी, पुण्यातून सौरभ महाकाळला अटक

‘मुख्यमंत्र्यांचे भाषण एमआयएमची मतं मिळवण्यासाठी’

सलमान खानचे वडील सलीम खान हे सुरक्षा रक्षकासह वॉकिंग साठी बँड स्टँड या ठिकाणी गेले होते. वॉकिंग झाल्यानंतर नेहमीच्या बाकड्यावर बसण्यासाठी गेले असता त्या बाकड्यावर त्यांच्या सुरक्षा रक्षकाला एक चिठ्ठी मिळून आली. ती चिठ्ठी त्याने सलीम खान यांच्याकडे दिली, सलीम खान यांनी चिठ्ठी उघडून बघितली असता त्या चिठ्ठीत सलीम खान आणि सलमान यांना उद्देशून ‘सलीम खान सलमान खान बहुत जल्द आपका मुसेवाला होगा’ असे लिहून त्या धमकी खाली इंग्रजी मध्ये k.G.B.L.B’ असे लिहले होते. त्यांनतर त्यांनी त्वरित या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल केलाआहे. त्यामुळे सलमान खान धमकी प्रकरणी महाकाळची चौकशी सुरु आहे.

Exit mobile version