देशातील नागरिकांची वैयक्तिक खाजगी माहिती चोरून विकणाऱ्या टोळीचा मुंबई गुन्हे शाखेने छडा लावला आहे. या प्रकरणी गुन्हे शाखा कक्ष ६च्या पथकाने दोन जणांना अटक केली आहे. या दोघांनी बँक रिकव्हरी एजंटसह अनेक कंपन्यांना ही माहिती विकल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर येत आहे.
भारतातील प्रत्येक नागरिकांची वैयक्तिक खाजगी माहिती ‘आधार कार्ड’ मध्ये आहे. कुटुंबाची माहिती, संपर्क क्रमांक, गावाचा पत्ता, राहत्या ठिकाणचा पत्ता तसेच कुटुंबाची माहिती प्रत्येकांनी आधारकार्ड तयार करण्यासाठी दिलेली आहे. केंद्र शासनाकडून प्रत्येक भारतीयांची माहिती जतन करून ठेवलेली आहे. प्रत्येक सरकारी कामे, तसेच शाळा, कॉलेज तसेच बँकांना आधारकार्ड लिंक करण्यात आलेले आहे.
हे ही वाचा:
परवानगीशिवाय अमिताभ बच्चन यांचा फोटो आणि आवाज वापरता येणार नाही!
श्रद्धा वालकर प्रकरणातील लव्ह जिहाद अंँगलबद्दल काय बोलल्या स्मृति इराणी
‘झुंड’ चित्रपटातील बाबूला नागपूर पोलिसांनी केली अटक
विक्रम गोखले यांच्या प्रकृतीला आराम पडतोय!
अनेक कंपन्या आणि बँक लोन रिकव्हरी एजंट भारतीय नागरिकांच्या वैयक्तिक माहिती मिळविण्यासाठी बेकायदेशीर मार्गाचा वापर करीत आहे. मुलुंडमध्ये राहणाऱ्या निखिल येलीगट्टी आणि राहुल येलिगट्टी दोन भावांनी ‘Tracenow.co.in’ आणि ‘Fonivotech.com’ या दोन वेबसाईटच्या (अप्लिकेशन) माध्यमातून दोघानी वेबसाईटवर विशिष्ट प्रकारचे युजर आयडी आणि पासवर्ड तयार करून हे युजर आयडी आणि पासवर्ड २ हजार रुपयांना घेऊन एक महिन्यासाठी विकले होते.
बँक रिकव्हरी एजंट व इतर कंपन्या हे युजर आयडी घेऊन त्यांना हव्या त्या व्यक्तीचे मोबाईल क्रमांक टाकुन माहिती मिळवत होते. पोलीसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या गुन्ह्याची व्याप्ती खूप मोठी असून या टोळीने अनेक खाजगी कंपन्या तसेच बँक रिकव्हरी एजंट यांना ही भारतीयांची माहिती विकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या माहितीच्या आधारे भारतीयांची फसवणूक गैरफायदा घेतला गेला असल्याचे संशय व्यक्त करण्यात येत आहे.