झाकीर नाईकच्या व्हिडीओंनी प्रभावित होऊन सलमानने मुथ्यालम्मा मंदिरात केली तोडफोड

पोलिसांनी दिली माहिती

झाकीर नाईकच्या व्हिडीओंनी प्रभावित होऊन सलमानने मुथ्यालम्मा मंदिरात केली तोडफोड

तेलंगणामधील सिंकदराबाद येथील मुथ्यालम्मा मंदिरात तोडफोड झाल्याची घटना घडली होती. यानंतर स्थानिकांनी संताप व्यक्त करत आरोपीच्या अटकेची मागणी केली होती. यानंतर या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. सलमान सलीम ठाकूर असे या आरोपीचे नाव आहे. ३० वर्षीय सलमान मुंबईचा असून संगणक अभियंता आहे. कथित मनी लाँड्रिंगच्या आरोपांसाठी भारतात वॉन्टेड असलेला आणि वादग्रस्त इस्लामिक धर्मोपदेशक झाकीर नाईक याचे वादग्रस्त व्हिडीओ पाहून सलमानने हे कृत्य केल्याचे मान्य केले आहे.

१४ ऑक्टोबर रोजी सिंकदराबादच्या मुथ्यालम्मा मंदिरात काही जणांनी तोडफोड केली होती. तसेच मूर्तीची विटंबना करण्यात आली. यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. अनेक लोक मंदिर परिसरात जमू लागले होते. तसेच काही स्थानिकांनी पळून जाणाऱ्या सलमान ठाकूरला पकडले आणि मारहाण केली. यानंतर पोलिसांनी सलमानला ताब्यात घेतले.

सलमान ठाकूर ऑक्टोबर महिन्यात सिंकदराबाद येथे आला होता. मोटिव्हेशनल स्पिकर मुन्नवर झमा यांच्या एका महिन्याच्या व्यक्तिमत्व विकास शिबिरात सहभाग घेण्यासाठी तो या ठिकाणी आला होता. त्याच्यासह त्याचे काही मित्रही होते. रेजिमेंटल बाजारातील एका हॉटेलमध्ये हे सर्व लोक वास्तव्यास होते. झमा हे इंग्लीश हाऊस अकादमीचे मालक असून पोलीस उपायुक्त रश्मी पेरुमल यांनी सांगितले की, सदर हॉटेल परिसरात अनधिकृतरित्या हा कोर्स सुरू होता.

दरम्यान, सलमान हा मुस्लीम धर्मप्रचारक डॉ. झाकीर नाईकचे व्हिडीओ पाहून प्रभावाखाली आला होता. यामुळेच एका विशिष्ट समाजाविरोधात त्याच्यात द्वेषाची भावना निर्माण झाली होती. सलमान सोशल मीडियावर सक्रिय होता. फेसबुक आणि युट्यूबवर मुस्लीम धर्मप्रचारक डॉ. झाकीर नाईक आणि इतरांचे व्हिडीओ तो सतत पाहत असायचा अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

हे ही वाचा..

झाकीर नाईक आता पाकिस्तानचा पाहुणा

नऊ बलुच विद्यार्थ्यांचे पाक अधिकाऱ्यांनी केले अपहरण

बाबा सिद्दीकींवर झाडलेल्या गोळ्या टर्किशमेड पिस्तूलातील!

राम गोपाल मिश्राच्या हत्येप्रकरणी मोहम्मद दानिशला अटक!

याआधीही त्याने अशा प्रकारचे कृत्य केल्याचे मान्य केले आहे. वसई- विरार आणि मुंबई येथेही त्याने मंदिरात नासधूस केली होती. मुळचा मुंब्रा येथे राहणारा सलमान ठाकूर याने मुंबई परिसरातही मंदिराचे पावित्र्य भंग केल्याचे मान्य केले आहे. २०२२ साली गणपती मंडपात बुट घालून येणे आणि मूर्तीसमोर आक्षेपार्ह वर्तन करणे, याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला होता.

Exit mobile version