हिंसाचाराने होरपळणाऱ्या मणिपूरमध्ये आता घुसखोरीने चिंता वाढवली आहे. या प्रकरणी राज्य सरकारने आसाम रायफल्सकडून अधिक माहिती मागवली आहे. जुलै महिन्याच्या दोन दिवसांत ७०० हून अधिक नागरिक सीमा ओलांडून मणिपूरमध्ये घुसल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, पुरेशा कागदपत्रांअभावी त्यांनी सीमेपलीकडून आत प्रवेशच कसा दिला? असा प्रश्न सरकारने उपस्थित केला आहे.
सीमेवर सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या आसाम रायफल्सकडून २२ आणि २३ जानेवारीला आलेल्या ७१८ म्यानमारवासींबाबत माहिती मागवण्यात आली आहे. या नागरिकांनी सोबत शस्त्रे आणली होती का? याबाबतही काही समजू शकलेले नाही. आसाम रायफल्सने या नागरिकांच्या प्रवेशाची माहिती दिली होती. या अवैधरीत्या प्रवेश करणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश राज्य सरकारने आसाम रायफल्सना दिले आहेत.
हे ही वाचा:
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच, दुसरे कुणीही नाही!
दगडूशेठ हलवाई गणपती दर्शनाने सुरू होणार पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा
चांदेरे फौडेशन, राजमाता जिजाऊ संघ सतेज करंडकाचे मानकरी
‘राज्य सरकार या ७१८ शरणार्थींच्या घुसखोरीकडे संवेदनशीलता आणि गंभीरपणे पाहते आहे. कारण कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्याच्या पार्श्वभूमीवर या बाबीचा आंतरराष्ट्रीय परिणामही होऊ शकतो,’ असे एका निवेदनात मणिपूरच्या गृह विभागाने म्हटले आहे. तसेच, आसाम रायफल्सना या अवैधरीत्या प्रवेश करणाऱ्या घुसखोरांची मणिपूरमध्ये परत पाठवणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या घुसखोरांबाबत अधिक माहिती काढावी तसेच, त्यांचे बायोमेट्रिक आणि छायाचित्रेही काढावी, असे निर्देश राज्य सरकारने चंदेल जिल्ह्याचे उपायुक्त आणि पोलिस अधिक्षकांना दिले आहेत.