कुख्यात गँगस्टर बचकानाला ठोकल्या बेड्या

कुख्यात गँगस्टर बचकानाला ठोकल्या बेड्या

कुख्यात गँगस्टर युसूफ बचकाना याला मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. युसूफ बचकाना अनेक वर्षांपासून फरार होता. त्याच्यावर हत्येसहित खंडणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने त्याला बेड्या ठोकल्या आहेत. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बेल्लोरी येथील तुरूंगातून बचकाना याचा ताबा घेतला आहे. त्याच्यावर खंडणीच्या एका गुन्ह्याचा आरोप आहे. या गुन्ह्याच्या संदर्भात अटक करण्यात आली आहे.

बचकाना याला किला कोर्टात हजर करण्यात आले होते. न्यायालयाकडे त्याच्या कोठडीची मागणी केली जाते आहे. न्यायालयाकडून देखील त्याला २७ जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हे ही वाचा:

फोन टॅपिंग काँग्रेसच्याच काळात, मोदींच्या नव्हे

१ ऑगस्टपासून घरोघरी लसीकरण सुरु

मणिपूर काँग्रेस प्रदेशाध्यक्षच भाजपाच्या वाटेवर?

मुख्यमंत्री गाडी चालवत मंत्रालयात सुद्धा जाऊदे

युसुफ बचकाना याचा ताबा मुंबई पोलिसांनी घेतला आहे. त्याच्यावरच्या खंडणीच्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांचे खंडणी विरोधी पथक करत आहे. खंडणी मागणारा युसुफ बचकाना आहे हे स्पष्ट झाल्यानंतर त्याची माहिती मिळवण्यात आली. युसुफ बचकाना याच्यावर मुंबईत १४ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

याशिवाय खंडणीसाठी युसुफने जेलमधून खंडणीसाठी फोन केला होता असा आरोप केला जात आहे. त्या अनुषंगाने देखील चौकशी केली जाणार आहे. त्याला आज किला कोर्टात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला २७ जुलैपर्यंत कोठडी सुनावली आहे.

Exit mobile version