‘ट्रान्सजेंडर डे’ च्या दिवशी अमेरिकेत क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार

यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला तर १८ जण जखमी झाले आहेत.

‘ट्रान्सजेंडर डे’ च्या दिवशी अमेरिकेत क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार

अमेरिकेत गोळीबाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यावर्षी अमेरिकेतील विविध शहरांमधून गोळीबाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आता अमेरिकेतील कोलोरॅडो स्प्रिंग्स येथे अंदाधुंद गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे.

कोलोरॅडो पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला तर १८ जण जखमी झाले आहेत. या घटनेशी संबंधित एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये क्लबबाहेर मोठ्या संख्येने पोलीस दल रस्त्यावर दिसत आहे.

गोळीबाराची ही घटना ‘Transgender Day of Remembrance’ रोजी घडली आहे. ट्रान्सजेंडर समुदायाच्या संघर्षाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी २० नोव्हेंबर रोजी ट्रान्सजेंडर डे ऑफ रिमेंबरन्स साजरा केला जातो. रविवारी रात्री कोलोरॅडो स्प्रिंग्स येथील ‘क्लब क्यू’मध्ये हा दिवस साजरा केला जात होता. यावेळी एका बंदुकधारी व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केला. या दुर्घटनेत अनेकजण गंभीर जखमी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हल्लेखोराने गोळीबार का केला याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नसली तरी ट्रान्सजेंडर समुदायातील लोकांना टार्गेट केल्याचे स्पष्ट झाले आहे.

हे ही वाचा : 

तारा रमपम ट्रम्प!! डोनाल्ड ट्रम्प आता पुन्हा करू शकतील ट्विट

सजा की मजा! तिहार तुरुंगात सत्येंद्र जैन यांनी घेतला मसाजचा आनंद

स्कुल व्हॅन चालकाने विद्यार्थ्यांनीवर अतिप्रसंग करण्याचा केला प्रयत्न

श्रद्धा वालकर, लव्ह जिहाद आणि हिंदू-मुस्लिम विवाह

हल्लेखोराने स्नायपर रायफलचा वापर करून या ‘गे क्लब’वर हल्ला केला आहे. आरोपीने हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून केला आणि या घटनेत नेमके किती लोक जखमी झाले आहेत? याबाबतचा अधिकृत तपशील अद्याप समोर आला नाही. २०१६ मध्येही असाच अमेरिकेतील ऑर्लॅंडो नाईटक्लबमध्ये गोळीबार झाला होता. या गोळीबारात किमान ५० लोकांना गोळ्या घालून ठार केले होते.

Exit mobile version