भारतात प्रवेश करताना चार बांगलादेशींना अटक!

बनावट आधार कार्डही जप्त, बीएसएफची कारवाई

भारतात प्रवेश करताना चार बांगलादेशींना अटक!

पश्चिम बंगालमधील भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेवरून भारतात जाण्याचा प्रयत्न करताना सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) चार बांगलादेशी आणि एका भारतीय नागरिकाला अटक केली आहे. बीएसएफने चार बांगलादेशी नागरिकांकडून बनावट आधार कार्डही जप्त केले आहेत.

बीएसएफने दिलेल्या निवेदनानुसार, पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील दक्षिण बंगाल फ्रंटियरच्या सीमावर्ती भागात १५ ऑक्टोबरच्या पहाटे आरोपींना अटक करण्यात आली. मुर्शिदाबादमधील बामनाबाद सीमा चौकीवर संशयास्पद हालचाली पाहिल्यानंतर बीएसएफच्या जवानांनी अलार्म वाजवला आणि घुसखोरांच्या दिशेने ते पुढे सरकले, असे बीएसएफकडून सांगण्यात आले.

तथापि, आरोपींनी प्रतिकार केला आणि जबरदस्तीने भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा त्यांच्या जवानांनी जोरदार प्रतिउत्तर दिले तेव्हा घुसखोर पसार झाले आणि उंच गवतामध्ये लपण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यानंतर संशयितांना अटक करण्यात आली.

हे ही वाचा : 

हा बघा काँग्रेस नेत्याचा प्रताप !

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट!

कर्नाटकातील भ्रष्टाचाराचा फायदा राहुल गांधींना झाला!

लाडकी बहिण योजनेला बंद कराल तर ‘करेक्ट कार्यक्रम’ झालाच समजा!

तपासादरम्यान, संशयितांकडून चार बनावट आधार कार्ड जप्त करण्यात आले आहेत. अधिक चौकशी केली असता, आरोपींनी बीएसएफ अधिकाऱ्यांना सांगितले की त्यांचा रोजंदारी कामगार म्हणून काम करण्यासाठी बनावट कागदपत्रांसह चेन्नईला जाण्याचा इरादा होता. या चार बांगलादेशी नागरिकांनी सांगितले की, त्यांनी बांगलादेशातील राजशाहीमधील गोदागरी उपजिल्ह्यातील एका बांगलादेशी व्यक्तीकडून बनावट भारतीय कार्ड खरेदी केले. यापैकी प्रत्येकाने बनावट ओळखपत्रांसाठी एक हजार बांगलादेशी टाके दिले होते. चौकशी केल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यांना स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

यावर बोलताना बीएसएफचे डीआयजी एन. के. पांडे म्हणाले, हे ऑपरेशन देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी आमच्या जवानांच्या अखंड दक्षतेचा एक दाखला आहे. बनावट कागदपत्रांचा वापर करून बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न होत होता. परंतु अशा प्रयत्नांना बीएसएफ हाणून पाडण्यासाठी कटिबद्ध आहे.

 

Exit mobile version