30 C
Mumbai
Friday, July 5, 2024
घरक्राईमनामाइटलीत तीन जणांनी इंडियन एक्स्प्रेसच्या कार्यकारी संचालकाची बॅग लांबवली

इटलीत तीन जणांनी इंडियन एक्स्प्रेसच्या कार्यकारी संचालकाची बॅग लांबवली

तीन पोलिस, सीसीटीव्ही नाही: भारतीय अधिकाऱ्यांनी केली मदत

Google News Follow

Related

इंडियन एक्स्प्रेस ग्रुपचे कार्यकारी संचालक अनंत गोयंका यांनी इटलीतील मिलान विमानतळावर त्यांना आलेला भयंकर अनुभव कथन केला. या विमानतळावर त्यांच्या आईची पैसे आणि पासपोर्ट असलेली बॅग तीन जणांच्या टोळीने चोरली. या विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेच्या तीव्र कमतरतेवर टीका करताना गोयंका यांनी त्यांना मदत करण्यासाठी तत्पर कारवाई केल्याबद्दल भारतीय अधिकाऱ्यांचे कौतुक केले.

याबाबतची घटना गोयंका यांनी ‘एक्स’वर शेअर केली. विमानतळावर अशा घटना खूप जास्त वारंवार घडत आहेत. तरीही येथील पोलिसांनी अत्यंत कमी मनुष्यबळाचे तसेच, महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही नसल्याचे कारण सांगत मदत करण्यास असमर्थता दर्शवल्याचे यात नमूद केले.

हे ही वाचा:

पंतप्रधानांचा खास संदेश, ‘आम्हाला तुमचा अभिमान आहे’

विराट कोहलीच्या पाठोपाठ रोहित शर्माचीही टी २०मधून निवृत्ती

भाजप सर्व सहकारी पक्षांना बरोबर घेऊन आत्मविश्वासाने निवडणूक लढणार

राज्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजाना’ सुरु करणार

‘काही दिवसांपूर्वी इटलीतील मिलान विमानतळावर तीन जणांच्या टोळीने त्यांच्या कुटुंबाला लक्ष्य केले. त्यांचे लक्ष विचलित केले आणि त्यांच्या आईची पैसे आणि पासपोर्ट असलेली बॅग चोरली. त्यांनी विमानतळ पोलिसांशी संपर्क साधला असता पोलिसांनी सांगितले की, गेल्या सहा तासांत घडलेली ही चौथी घटना आहे. ते म्हणाले, येथे केवळ आमच्यापैकी तीनच पोलिस आहेत. त्यामुळे आम्ही फार काही करू शकत नाही. पोलिसांनी सांगितले की, प्रवासी व्हॅट रिफंड फॉर्म भरतात त्या परिसरात सीसीटीव्ही नाहीत, हँडबॅग चोरीला गेली होती. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, प्रवाशांच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी ते क्षेत्र सीसीटीव्ही कव्हरेज अंतर्गत नाही. पश्चिमेतील जागृत विचारधारा गुन्हेगारांना कशी मदत करत आहे, हेच यातून दिसून येते,’ असे अनंत गोयंका यांनी म्हटले.

दुसरीकडे, गोयंका यांनी भारतीय वाणिज्य दूतावासाने या प्रकरणात त्वरित कारवाई केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. त्यांनी लिहिले, त्यांनी प्रवासासाठी तत्परतेने तात्पुरता पासपोर्ट दिला आणि खूप मदत केली. अशा दरोड्याच्या प्रकारामुळे भारतीय वाणिज्य दूतावासाने आज एका दिवसात हा चौथा इमर्जन्सी पासपोर्ट दिल्याचेही गोयंका यांनी सांगितले.
‘भारताच्या इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी मला सांगितले की, या वर्षी स्पेन आणि इटलीमधून अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत,’ असे गोयंका यांनी सांगितले. त्यांनी मिलानमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने त्यांना मदत करण्याबाबत आभार मानले आणि जे सुट्टीवर आहेत, त्यांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
163,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा