25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामागुजरात किनारपट्टीवर २०० कोटींचे अमली पदार्थ पकडले; पाकचा संबंध

गुजरात किनारपट्टीवर २०० कोटींचे अमली पदार्थ पकडले; पाकचा संबंध

, ६ पाकिस्तानी नागरिकांना अटक

Google News Follow

Related

गुजरातमध्ये दहशतवादविरोधी पथक आणि भारतीय तटरक्षक दलाला मोठे यश मिळाले आहे. दहशतवादविरोधी पथकाने भारतीय तटरक्षक दलाच्या संयुक्त कारवाईत राज्याच्या किनारपट्टीपासून अरबी समुद्रात एका पाकिस्तानी मासेमारी बोटीतून २०० कोटी रुपयांचे ४० किलो हेरॉईन जप्त केल्याची माहिती एटीएसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानी दिली . या प्रकरणी सहा पाकिस्तानी नागरिकांनाही ताब्यात घेण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं.

तटरक्षक दल आणि एटीएसच्या संयुक्त पथकाने कच्छ जिल्ह्यातील जाखाऊ बंदराजवळ समुद्रात अंमली पदार्थ घेऊन जाणारी मासेमारी बोट अडवली. हेरॉईन गुजरातच्या किनारपट्टीवर उतरल्यानंतर रस्त्याने पंजाबला नेले जाणार होतं अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

एका गुप्त माहितीच्या आधारे एटीएसनं पाकिस्तानची बोट अडवली आणि सहा पाकिस्तानी नागरिकांना पकडले, त्यांच्याकडून ४० किलो हेरॉइन सापडले. जप्त केलेल्या बोटीसह एटीएस आणि तटरक्षक दलाचे अधिकारी आज जखाऊ किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून गुजरात एटीएसकडून ड्रग्जविरोधातील मोहीम तीव्र करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वीही मोठ्या कारवाईत अमली पदार्थांची मोठी खेप पकडण्यात आली होती. पुन्हा एकदा गुजरात एटीएसने मोठी कारवाई करत ड्रग्जची मोठी खेप पकडण्यात यश मिळवले आहे.

हे ही वाचा:

महाराष्ट्रातल्या या पक्षांवर निवडणूक आयोगाची कारवाई

अयोध्येतील राम मंदिरावर १८०० कोटी खर्च होणार

इलेक्ट्रिक स्कूटर रिचार्जिंग युनिटला लागलेल्या आगीत १० जणांचा मृत्यू

मुख्यमंत्री शिंदेंकडून ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ जाहीर

या अ्राधी २०० कोटींचे ड्रग्ज पकडले

या आधी गुजरात एटीएस आणि महसूल गुप्तचर संचालनालयाच्या संयुक्त पथकाने पश्चिम बंगालमधील कोलकाता बंदराजवळ एका कंटेनरमधून १९७.८२ कोटी रुपयांचे ३९.५ किलो हेरॉईन जप्त केले. ही औषधे भंगार बॉक्समध्ये दुबईहून भारतात आणण्यात आली होती. गुजरातचे पोलीस महासंचालक आशिष भाटिया यांनी गांधीनगरमध्ये सांगितले की, दुबईच्या जेबेल अली बंदरातून शिपिंग कंटेनरमध्ये पाठवण्यात आलेल्या १२ गिअर बॉक्समध्ये प्रतिबंधित पदार्थ लपवण्यात आला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा