27 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरक्राईमनामाभारत-न्यूझीलंड सामन्याच्या तिकिटांची काळाबाजारी करणाऱ्याला अटक!

भारत-न्यूझीलंड सामन्याच्या तिकिटांची काळाबाजारी करणाऱ्याला अटक!

तिकिटेही करण्यात आली जप्त

Google News Follow

Related

भारत विरुद्ध न्यूझीलंड आयसीसी विश्वचषक उपांत्य फेरीच्या सामन्याची तिकिटांच्या काळाबाजारी प्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलेअसून एकाला अटक करण्यात आली आहे.अटक करण्यात आलेल्या आरोपी जवळून दोन तिकिटे जप्त करण्यात आली आहे. चार ते पाच पटीने काळ्याबजारात तिकिटांची विक्री सुरू होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

मुंबईतील वानखेडे स्टेडियम वर बुधवारी भारत-न्यूझीलंड विश्वचषक क्रिकेट सामन्याची उपांत्य फेरी आहे. जगभरातून क्रिकेटप्रेमी हा सामना स्टेडियमवर बघण्यासाठी उत्सुक आहे, या सामान्याची जवळपास सर्व तिकिटे ऑनलाइन पद्धतीने विकली गेली आहे.अनेक क्रिकेटप्रेमी या सामन्याची तिकीटासाठी अव्वा च्या सव्वा भाव देण्यास तयार आहे.काही जणांनी या सामन्याच्या तिकिटांची काळाबाजारी सुरू करून काही वेबसाईटवर ही तिकिटे विक्री साठी ठेवली असून या तिकीटांचे काळ्याबाजारातील दरपत्रक देखील वेबसाईटवर ठेवण्यात आले होते.

हे ही वाचा:

टिटवाळा रेल्वे स्थानक परिसरात एका महिलेवर बलात्कार!

कुत्र्याने बंगळुरूला परतून लावले विस्तारा विमान!

५.२ रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या धक्क्याने पाकिस्तान हादरले

पवार त्यांच्याच सापळ्यात अडकले…

जेजे मार्ग पोलिसांनी बोगस ग्राहक बनून एका वेबसाईटवर काळ्याबाजारात तिकिटे खरेदी करण्याची तयारी दर्शवून मालाड येथून मंगळवारी आकाश कोठारी याला तिकिटांची विक्री प्रकरणी ताब्यात घेतले, परंतु पोलिसांना त्याचाकडे एकही तिकीट मिळून आले नाही, दरम्यान पोलिसांनी त्याच्याकडे केलेल्या चौकशीत रोशन गुरुबक्षणी यांच्याकडे तिकिटे असल्याची माहिती मिळाली. यमाहितीच्या आधारे पोलिसानी रोशन गुरुबक्षणी याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून उपांत्य फेरी सामन्याची दोन तिकिटे जप्त करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ.प्रवीण मुंढे यांनी दिली.
जप्त करण्यात आलेल्या तिकिटांची मूळ किंमत २० हजार असून ही तिकिटे काळ्याबाजारात चार ते पाच पटीने विक्री करण्यात येत होती अशी माहिती डॉ.मुंढे यांनी दिली. दरम्यान तिकिटांचा काळाबाजार ज्या वेबसाईटवर सुरू होता त्याच्यावर तिकिटांचे दरपत्रक देण्यात आले होते.

उपांत्य फेरीचे काळ्या बाजारातील दरपत्रक
उपांत्य फेरी सामन्याच्या तिकिटांची काळाबाजारातील दरपत्रक एकावेबसाईटवर (संकेतस्थळ) देण्यात आले होते, त्यात खालील प्रमाणे तिकिटांचे दर आणि माहिती देण्यात आली होती.
क्रिकेट विश्वचषक
उपांत्य फेरी – १ : वानखेडे, मुंबई
तिकिटे:-
सुनील गावस्कर लेव्हल २ – २७०००
गरवारे स्तर ३ – ३३०००
सचिन लेव्हल ३ – ३२०००
सचिन लेव्हल १ – ४००००
दिवेचा स्तर २ – ४५०००
गरवारे स्तर १ – ५००००
सेमी हॉस्पिटॅलिटी (यूएल फूड बुफे, बीअर आणि वाईन)
सचिन तेंडुलकर लेव्हल २ – १,२०,०००
दिलीप वेंगसरकर लेव्हल २ – १,२०,०००
MCA स्तर १ (फूड कूपनसह ज्यामध्ये अन्न आणि मद्य दोन्ही आहेत) – १,00,000
AC बॉक्स २.५ लाख पासून सुरू होतो (सचिन तेंडुलकर लेव्हल २ आणि Mca लेव्हल ३)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा