उत्तर महाराष्ट्रात सापडले २४० कोटींचे घबाड

उत्तर महाराष्ट्रात सापडले २४० कोटींचे घबाड

आयकर विभागाने धुळे, नाशिक आणि नंदुरबारमध्ये केलेल्या कारवाईत तब्बल २४० कोटींचे घबाड सापडले आहे. उत्तर महाराष्ट्रातील प्रामुख्याने धुळे, नाशिक, नंदुरबारमध्ये एकूण ३२ ठिकाणी जमीन खरेदी- विक्री करणारे व्यावसायिक, सरकारी कंत्राटदार, कंत्राटादारांशी संबंधित बिल्डर्स यांच्या निवासस्थानावर हे छापे टाकण्यात आले.

बुधवार २२ डिसेंबर रोजी पहाटे सुरू झालेली ही कारवाई सुमारे पाच दिवस सुरू होती असे वृत्त आहे. या पाच दिवसाच्या कारवाईत सुमारे ६ कोटी रुपयांची रोकड, ५ कोटींचे दागिने जप्त करण्यात आले असून सुमारे २४० कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आली आहे. तसेच अनेक व्यावसायिकांनी तब्बल २५ कोटींचे व्यवहार रोखीत केल्याचे समोर आले आहे.

हे ही वाचा:

सोबत पुरुष असेल तरच महिलांना प्रवास; तालिबान्यांचा फतवा

जालन्यातील १२ कुटुंबांची हिंदू धर्मात घरवापसी

सनी लिओनीच्या त्या गाण्यात होणार बदल

राज्यपाल घेणार विधानसभा अध्यक्षपदाबाबत निर्णय

दागिन्यांमध्ये सोन्याची बिस्कीटे, हिरे,  मोत्याचे दागिने सापडले. अनेकांनी दुसऱ्याच्या नावावर व्यवहार केल्याचे आढळून आले. नातेवाईकांच्या घरी पैसे दडवून ठेवल्याचे समोर आले.

राज्यातील प्रमुख शहरांमध्ये ही मोठी कारवाई करण्यासाठी सुमारे १७५ अधिकारी २२ गाड्यांमधून एकाचवेळी वेगवेगळ्या मार्गाने संबंधित ठिकाणांवर पोहचले. या कारवाईसाठी ठाणे, पुणे, नागपूर, कल्याण येथील अधिकाऱ्यांचीही मदत घेण्यात आली होती. आयकर विभागाच्या या कारवाईने उत्तर महाराष्ट्रातील अनेक बिल्डर आणि व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

Exit mobile version