28 C
Mumbai
Sunday, November 3, 2024
घरक्राईमनामाआयकर खात्याची धुळवड! अनिल परब यांनी रिसॉर्टच्या बांधकामासाठी वापरले रोख ६ कोटी

आयकर खात्याची धुळवड! अनिल परब यांनी रिसॉर्टच्या बांधकामासाठी वापरले रोख ६ कोटी

Google News Follow

Related

मार्च महिन्याच्या प्रारंभी ८ मार्चला महाराष्ट्र व मुंबईसह २६ ठिकाणी पडलेल्या आयकर खात्याच्या धाडी या राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित होती, अशी माहिती आता समोर येते आहे. होळीच्या दिवशीच ही माहिती उघड झाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईत झालेली इन्कम टॅक्सची धाड अनिल परब यांच्याशी संबंधित होती. त्यामुळे आयकर खात्याच्या रडारवर अनिल परब यांची मालमत्ता असल्याचे समोर येते आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात २६ ठिकाणी ८ मार्चला हे छापे पडले होते. यात केबल ऑपरेटर, सरकारी अधिकारी आणि काही व्यावसायिकावर पडली होती धाड.

यासंदर्भात जी माहिती समोर येते आहे त्यानुसार दापोलीतील एक जागा परब यांनी २०१७ मध्ये खरेदी केली होती त्या जागेच्या संबंधित काही कागदपत्र आयकर खात्याच्या हाती लागली आहे. २०१७ ला ही जागा १ कोटी रुपयांना खरेदी केली होती ज्याची नोंदणी २०१९ ला झाली, अशीही माहिती समोर आली आहे. ही जागा परब यांनी २०२० मध्ये एका व्यक्तीला १ कोटी १० लाख रुपयांना दिली. याच जागेवर २०१७ ते २०२० दरम्यान एक रिसॉर्ट बनवण्यात आले. हे रिसॉर्ट बनवण्यासाठी ६ कोटी रोख खर्च करण्यात आले. या खर्चाची नोंद परब यांच्याकडे करण्यात आलेली नाही, अशीही सूत्रांची माहिती आहे.

हे ही वाचा:

अभिषेक बॅनर्जी यांना ईडीची नोटीस

तीन कोटी द्या, मग मिळेल नवाब मालिकांना जामीन!

चक्क या कारणामुळे ‘शारापोव्हा’ व ‘शूमाकर’ यांच्यावर गुन्हा दाखल!

काँग्रेसचे भवितव्य आणि महात्मा गांधीजींचे विचार

 

सरकारी अधिकारी बजरंग खरमटे यांच्या मालमत्तेची माहितीही आयकर खात्याने मिळवली. खरमाटे यांनी पुणे सांगली बारामती आणि एका ठिकाणी १०० एकर जमीन मागच्या ७ वर्षात खरेदी केली आहे. काही दुकाने आणि आलिशान बंगल्याची माहितीही आयटीने मिळवली आहे. पुण्यात त्याचे फार्म हाऊस आणि बंगला आहे. तासगाव येथे आलिशान फार्म हाऊस असून सांगलीत त्याचे दोन बंगले आहेत. पुण्यात त्याचे पाच फ्लॅट्सही आहेत. जी दुकाने आहेत तिथे तनिष्क आणि कॅरट या नामांकित ब्रँडची शोरूम आहेत.एक फ्लॅट नवी मुंबईतही आहे. बनावट कंत्राटांच्या माध्यमातून २७ करोड रुपये मिळविल्याची बिले आयटीला मिळाली. बारामती परिसरातील जमिनीची २ करोड रुपयांच्या पावत्या आयटीने मिळवल्या आहेत. छाप्यात ६६ लाखांची रोख रक्कम आयटीने जप्त केली आहे. डिजिटल पुरावे आणि कागदपत्रेही आयटीने मिळवली आहेत. यासंदर्भात अधिक तपास आयटीकडून सुरू आहे.

दरम्यान यासंदर्भात भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत म्हटले आहे की, पश्चिम महाराष्ट्रातील एका बड्या राजकारण्याशी घट्ट संबंध असलेल्या सरकारी अधिकाऱ्याकडून बक्कळ रोकड, जमिनी आणि मालमत्तांची माहिती आयकर खात्याच्या हाती आली आहे? कोण ते ओळखा पाहू???

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
186,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा