आयकर विभागाकडून पॉलीकॅब इंडियाच्या ५० हून अधिक ठिकाणांवर छापे

बाजारात कंपनीचे शेअर्स ३ ते ४ टक्क्यांनी घसरले

आयकर विभागाकडून पॉलीकॅब इंडियाच्या ५० हून अधिक ठिकाणांवर छापे

इलेक्ट्रिकल वायर, पंखे आणि दिवे तयार करणाऱ्या पॉलीकॅब इंडिया कंपनीवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. शुक्रवार, २२ डिसेंबर रोजी देशभरातील पॉलीकॅब इंडियाच्या ५० हून अधिक ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. माहितीनुसार, कंपनी व्यवस्थापनाच्या कार्यालयांची आणि घरांचीही झडती घेण्यात येत आहे. या छापेमारीचा परिणाम शेअर मार्केटवरही दिसून येत आहे.

पॉलीकॅब इंडिया ही कंपनी इलेक्ट्रिकल वस्तू म्हणजेच घरात वापरल्या जाणाऱ्या विजेशी संबंधित वस्तू बनवते. कंपनी इलेक्ट्रिकल वायर, कंट्रोल केबल्स, पॉवर केबल्स, बिल्डिंग वायर्स, इंस्ट्रुमेंटेशन केबल्स, पंखे तसेच दिवे तयार करते. सप्टेंबर २०२३ मध्ये पॉलीकॅब इंडियाने ४३६.८९ कोटी निव्वळ नफा कमावला होता, जो मागील वर्षाच्या तुलनेत ५८.५ टक्के वाढला होता. कंपनीचा महसूल २७ टक्क्यांनी वाढला होता.

दरम्यान, या कंपनीवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. माहितीनुसार, मुंबई, पुणे, दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई, बडोदा, सिकंदराबाद आणि कोलकाता येथील कार्यालयांवर छापे टाकण्यात आले आहेत. कंपनीच्या गोदामावर आणि उत्पादन सुविधांवरही छापे टाकण्यात आले आहेत. पॉलीकॅबने कमी नफा दाखवण्यासाठी त्याच्या उत्पादन सुविधांवर खर्च वाढविला आणि कर दायित्वे कमी करण्यासाठी महसूल चुकीचे सादर केला, असे आरोप आहेत.

हे ही वाचा:

जम्मू-काश्मीर; दहशतवाद्यांच्या हल्ल्यात ५ जवान हुतात्मा!

समुद्रीचाच्यांना रोखण्यासाठी अदनच्या खाडीत आयएनएस कोच्ची, कोलकाता तैनात

‘फुटीरतावाद्यांविरोधात कॅनडा कारवाई करेल, ही आशा’

चांद्रयान- ३ च्या ऐतिहासिक कामगिरीसाठी आइसलँडकडून ‘इस्रो’चा सन्मान

इकॉनॉमिक टाईम्सच्या अहवालानुसार, २००९ मध्ये देखील उत्पादन शुल्क आणि करचुकवेगिरीप्रकरणी देशभरातील पॉलीकॅबच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले होते. आता सुरू असलेल्या छापेमारीचा परिणाम देशातील सर्वात मोठी वायर आणि केबल कंपनी पॉलीकॅब इंडियाच्या शेअर्सवरही दिसून येत आहे. शेअर बाजारात कंपनीचे शेअर्स ३ ते ४ टक्क्यांनी घसरले आहेत.

Exit mobile version