आयकर विभागाने मोठी कारवाई करत चिनी मोबाईल कंपनीच्या कार्यालयांवर छापे टाकले आहेत. चीनची मोबाईल कंपनी ओप्पोच्या कार्यालयांवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. वार्षिक अहवालात जास्तीचा खर्च दाखवून करोडो रुपयांचे कर बुडवल्याचा आरोप कंपनीवर आहे. ‘एबीपी माझा’ने सूत्रांच्या हवाल्याने ही कारवाईची माहिती दिली आहे.
आयकर विभागाने ओप्पोच्या अनेक मॅन्युफॅक्च्युरिंग यूनिट, गोदाम आणि कॉर्पोरेट ऑफिसवर छापेमारी केली आहे. कारवाई दरम्यान आयकर विभागाला अनेक महत्त्वाचे दस्ताऐवज मिळाले असल्याचे वृत्त आहे. मात्र, अद्याप याविषयी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मुंबई, दिल्लीतील गुडगाव, नोएडा, हैद्राबाद, बंगळूरू, रेवाडीमध्ये छापे टाकण्यात आले आहेत. सकाळी ९ वाजल्यापासून ही कारवाई सुरू होती. या अगोदर उत्तरप्रदेशमधील ओप्पोच्या काही कार्यालयांमध्ये आयकर विभागाने छापे टाकले होते.
हे ही वाचा:
उमेदवाराच्या कुटुंबात बारा सदस्य; पण त्याला मत मात्र एकच!
नवा स्मार्टफोन घेतला आणि ढोल वाजले!
अहमदनगरला भाजपाचा झेंडा; महाविकास आघाडीला ठेंगा
१७० बहुमत असतानाही महाविकास आघाडीच्या मानगुटीवर भीतीचे भूत
भारतात स्मार्टफोनसाठी मोठी बाजारपेठ आहे. भारतात स्मार्टफोनच्या बाजारपेठेची उलाढाल सुमारे २.५ लाख कोटीच्या आसपास आहे. यामध्ये ७० टक्के हिस्सा चिनी कंपन्याचा आहे. केंद्र सरकारने संसदेत दिलेल्या माहितीनुसार देशात सध्या ९२ चिनी कंपन्या रजिस्टर्ड आहे. त्यापैकी ८० कंपन्या सक्रिय आहेत. ओप्पो ही त्यातील एक महत्त्वाची कंपनी आहे.