यवतमाळमध्ये जावयाने पत्नी, सासरा आणि दोन मेहुण्यांना संपवलं

पत्नीच्या चारित्र्यावर संशय; हल्ल्यात सासू गंभीर जखमी

यवतमाळमध्ये जावयाने पत्नी, सासरा आणि दोन मेहुण्यांना संपवलं

यवतमाळ जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कळंब तालुक्यातील तिरझडा पारधी बेड्यावर येथे मध्यरात्री मोठे हत्याकांड घडले आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने सासरवाडीत पत्नीसह चौघांची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने त्याची पत्नी, सासरा आणि त्याच्या दोन मेव्हण्यांची निर्घृणपणे हत्या केली.

यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील तिरझडा गावात मंगळवार, १९ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता ही दुर्दैवी घटना घडली. कौटुंबिक वादातून एकाच कुटुंबातील चौघांची हत्या झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे. दरम्यान, आरोपी जावई गोविंद पवार याला कळंब पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

या घटनेत एकाच कुटुंबतील चौघांचा जागीच मृत्यू झाला असून सासू गंभीर जखमी आहे. पत्नी रेखा पवार, सासरे पंडित घोसाळे, मेहुणा ज्ञानेश्वर भोसले आणि सुनील भोसले यांचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळंब तालुक्यातील तिरझडा पारधी बेड्या येथे पत्नी राहत होती. चारित्र्याच्या संशयावरून पती पत्नीमध्ये वाद होत होते. पत्नीचे विवाहबाह्य अनैतिक संबंध असल्याचा संशय गोविंद याला होता. त्यावरून पती- पत्नीत नेहमी वाद व्हायचे. या कारणावरून गोविंद पत्नी रेखाला नेहमी मारहाण करीत होता. त्यामुळे कंटाळून ती गेल्या काही दिवसांपासून माहेरी राहत होती. याच कारणावरून गोविंदचे पत्नी आणि तिच्या माहेरच्या लोकांसोबत सतत वाद सुरू होते. या वादातून हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

घटना उघडकीस आल्यावर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच, पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत. तसेच, वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी देखील घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आहे. तसेच, या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

राहुल गांधींचा पत्ता कट, ममता म्हणतात खरगे पंतप्रधानपदाचा चेहरा!

नोटांवर एका माणसाचाच फोटो का? सावरकर,टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे फोटो कधी येणार?

तामिळनाडूत पुरामुळे हाहाःकार; रेल्वे स्थानकावर ८०० प्रवासी अडकले

ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक घेणार त्यांची जागा

दरम्यान, पती रात्री ११ च्या सुमारास पत्नीच्या घरी पोहचला. त्याने सासरच्या लोकांवर अचानक धारदार शस्त्राने हल्ला केला. या घटनेत पत्नी, मेहुणा, सासऱ्याचा जागीच मृत्यू झाला. तर जावयाच्या हल्ल्यात सासू गंभीर जखमी झाल्या आहेत. सासूला रुग्णालयात उपचरासाठी दाखल करण्यात आले आहे.

Exit mobile version