प्रेमासाठी एकाने केली आत्महत्या तर दुसऱ्याने रचले अपहरणाचे नाट्य

प्रेमासाठी एकाने केली आत्महत्या तर दुसऱ्याने रचले अपहरणाचे नाट्य

मुलींच्या प्रेमात कर्जबाजारी झालेल्या दोन तरुणांपैकी एकाने स्वतःची जीवनयात्रा संपवली तर दुसऱ्याने स्वतःच्या अपहरणाचा कट रचून वडिलांकडे २ लाखाची खंडणी मागीतल्याची घटना समोर आली आहे. या दोन्ही घटनाप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाण्यातील कळवा येथे राहणाऱ्या विक्रम मोरे (२४) याचे एका तरुणीसोबत प्रेमप्रकरण सुरू होते. काही महिन्यांपूर्वी प्रेयसीने विक्रमकडे पैशांची मागणी केली, मात्र एवढी मोठी रक्कम आपल्याकडे नसून हवं तर माझ्या नावावर कर्ज काढून देतो मात्र त्याची परतफेड करावी लागेल असे विक्रमने प्रेयसीला सांगितले. तिने होकार देताच विक्रमने एका खाजगी फायनान्स कंपनीकडून स्वतःच्या नावावर कर्ज काढून प्रेयसीला ती रक्कम दिली.

हे ही वाचा:

धनंजय मुंडेंना एकनाथरावांनी कोणता संदेश दिला?

पक्षप्रमुख करणार ‘महाप्रबोधना’ची उठाठेव…

‘कोणताही देव उच्च जातीचा नसतो’

देवगडला मत्स्य व्यवसाय महाविद्यालय मंजूर करा

 

काही महिने हप्ते भरल्यानंतर पुढील हप्ते विक्रम भरू न शकल्याने फायनान्स कंपनीच्या लोकांनी विक्रमकडे हप्ते भरण्यासाठी तगादा लावला. विक्रमने प्रेयसीला हप्ते भरण्यास सांगितले असता उलट तिनेच विक्रमला पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिली. दोन्ही बाजूनी अडकलेल्या विक्रमने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. विक्रमकडे सापडलेल्या चिठ्ठीत हा प्रकार समोर आला असून कळवा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

दरम्यान, उल्हासनगर येथे राहणाऱ्या विजय भारती (२२) या तरुणाने प्रेयसीला भेट देण्यासाठी हप्त्यावर महागडा मोबाईल विकत घेतला होता, मोबाईलचे हप्ते थांबल्यामुळे त्याला सतत हप्ते भरण्यासाठी खाजगी फायनान्स कंपनीकडे तगादा लावला जात असल्यामुळे विजयने स्वतःच्या अपहरणाचा कट रचून वडिलांकडे २लाख रुपयांची मागणी केल्याचे समोर आले. मध्यवर्ती पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून विजय याला कर्नाटक येथून ताब्यात घेतले.

Exit mobile version