रिझर्व्ह बँक धमकी प्रकरणी पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या

‘खिलाफत इंडिया’ नावाने रिझर्व्ह बँकेला ईमेल आला होता

रिझर्व्ह बँक धमकी प्रकरणी पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या

रिझर्व्ह बँक धमकी प्रकरणी मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली. धमकी प्रकरणी पोलिसांनी गुजरातमधील बडोद्यातून तिघांना ताब्यात घेतलं आहे. ‘खिलाफत इंडिया’ या नावाने रिझर्व्ह बँकेला ईमेल आला होता. या ईमेलमुळे मोठी खळबळ उडाली होती. सध्या संशयित आरोपींची कसून चौकशी सुरू आहे.

मुंबईत एकूण ११ ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा एक मेल मंगळवारी दुपारी आला होता. दुपारी दीड वाजता हे बॉम्ब ब्लास्ट होणार असल्याचं त्यात म्हटलं होतं. त्यानंतर पोलिसांनी या सर्व ठिकाणी शोधमोहीम केली असता काहीही आक्षेपार्ह आढळून आले नाही. पुढे ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले आणि एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेने सतर्क होऊन आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पथक तयार केले होते. २४ तासातच मुंबई पोलिसांनी कारवाई करत तिघांना ताब्यात घेतलं आहे. सध्या आता या संशयित आरोपींची चौकशी सुरू झाली असून हा मेल का केला होता आणि त्याच्या मागचा उद्देश काय होत आहे याचा मुंबई पोलिसांकडून तपास केला जात आहे.

हे ही वाचा:

केएल राहुलने भारताचा खेळ सावरला!

बीसीसीआयचा निर्णय; आयपीएल स्पॉन्सरशिपमध्ये चीनसाठी दरवाजे बंद

आता विनेश फोगाटनेही खेलरत्न, अर्जुन पुरस्कार परत करण्याचा घेतला निर्णय

राम मंदिर उद्घाटनाचे आमंत्रण नाकारणाऱ्या येचुरींना विहिंपचा सल्ला

काय आहे प्रकरण?

रिझर्व्ह बँकेच्या ऑफिशिअल मेलवर मुंबईत बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा मेल आला. त्यानंतर आरबीआयने पोलिसांना याची माहिती दिली. मुंबई पोलिसांनी त्यांच्या बाँब स्कॉडच्या मदतीने शोध सुरू केला. या मेलमध्ये अनेक गोष्टी नमूद करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जगातला सर्वात मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच त्यांनी भारतीय बँकांना लुटल्याचंही म्हटलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा आम्ही आमचं पाऊल उचलू अशी धमकी देण्यात आली आहे.

Exit mobile version