ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील एका इमारतीतील घरात खोलीच्या स्लॅबचे प्लास्टर पडून दोन जण जखमी झाल्याची घटना घडली. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले असून यासंदर्भात पालिकेचे अधिकारी तपास करत आहेत.
५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार, (घटनेची माहिती देणारे- छ.शि.म. रुग्णालय कळवा, ठाणे.) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ऑफिसच्या बाजूला, बुधाजी नगर, ठाणे (प.) येथे ३० वर्षे जुने बांधकाम असलेल्या दर्पण सोसायटी या चार मजली इमारतीच्या ए विंग तळ मजल्यावरील रूम नंबर १ (मालक – श्री. ) या रूम मधील स्लॅबचे प्लास्टर पडले. ही खोली तुषार चौधरी यांची असून त्यात भाडेकरू प्रसन्न धंडोरे राहतात. सदर घटनास्थळी कळवा प्रभाग समिती, बांधकाम विभागाचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी उपस्थित होते.
हे ही वाचा:
शिवसेनेचा खयाली पुलाव आणि आंधळी कोशिंबीर
उद्धव ठाकरे ‘दादर’चा गड राखतील ?
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मृत्यूचा खेळ
सदर खोलीत एकूण तीन व्यक्ती राहत होत्या. रूममधील स्लॅबचे प्लास्टर पडल्यामुळे घरामधील २ व्यक्तींना दुखापत झाली आहे. दुखापत झालेल्या व्यक्तीची नावे प्रसन्न धंडोरे. (वय २२ वर्षे) यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे. तर श्रद्धा धंडोरे ( वय २७ वर्षे) यांच्या डाव्या पायाला दुखापत झाली आहे.
सदर जखमी झालेल्या व्यक्तींना त्यांच्याच नातेवाईकांनी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा, ठाणे येथे उपचाराकरिता दाखल केले आहे. सदर खोलीचा विद्युत पुरवठा आपत्ती व्यवस्थापन कक्षातील विद्युत कर्मचाऱ्यांनी बंद केला आहे. सदर खोलीची पाहणी कळवा प्रभाग समिती चे बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी केली आहे.सदर खोलीत पडलेले प्लास्टर आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांकडून बाजूला करण्याचे काम सुरू आहे.