तेलंगणात हिंदू महिलांना दागिने काढण्याची सक्ती, बुरख्यातल्या महिलांना सूट

सोशल मीडियावर या बातमीने खळबळ, पोलिस तपास करणार

तेलंगणात हिंदू महिलांना दागिने काढण्याची सक्ती, बुरख्यातल्या महिलांना सूट

हिजाबच्या मुद्द्यावरून सध्या सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू असताना तेलंगणामध्ये मात्र विचित्र परिस्थिती दिसली आहे. तिथे राज्य लोकसेवा आयोगाच्या पोलिस भरती परीक्षेसाठीच्या एका परिक्षा केंद्रावर चक्क हिंदू महिलांना मंगळसूत्रे, नाकातील दागिने, पायातील पैंजण, हातातील बांगड्या, गळ्यातील सोनसाखळ्या किंवा इतर दागिने काढून टाकण्यास सांगण्यात आले. परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी हे सगळे दागिने प्रवेशद्वाराजवळ असलेल्या पोलिसांकडे देण्याच्या सूचना करण्यात आल्या पण त्याचवेळी बुरख्यात असलेल्या मुस्लिम महिलांना मात्र कोणतीही तपासणी न करता आत सोडण्यात येत असल्याचे व्हीडिओतून स्पष्ट झाले. याची दखल प्रमुख प्रसारमाध्यमांनीही घेतली.

हा व्हीडिओ सगळीकडे व्हायरल होत होता. एका बाजुला बुरख्यात असलेल्या मुस्लिम महिलांना केवळ कार्ड दाखवून आत सोडले जात होते तर दुसरीकडे हिंदू महिलांना मात्र त्यांच्या हातातील बांगड्या काढण्यास सांगण्यात येत होते. त्या निघत नसतील तर काचेच्या बांगड्या महिलांनी फोडून टाकल्याचे दिसत होते. पायातील पैंजण, गळ्यातील साखळीही महिलांनी प्रवेश करण्यापूर्वी काढून दिली.

हे ही वाचा:

सरकारकडून १०० रुपयात ‘आनंदाचा शिधा’

आमचे २४३ सरपंच, आकडे तपासा, मुख्यमंत्री शिंदेंनी दिले आव्हान

रितेश, जीनिलीयाच्या कंपनीवर मेहेर नजर का?

नवाब मलिकांचा तुरुंगातील मुक्काम वाढला

 

त्यावरून नव्या धर्मनिरपेक्षतेचे दर्शन घडल्याची टीका लोकांकडून होत होती. यावर स्थानिक भाजपा नेत्यांनी जोरदार आक्षेप घेतला तर इतर पक्षाच्या नेत्यांनी असे एखाद-दोन ठिकाणी घडले असेल बाकी कुठे झालेले नाही, असे कातडीबचाव धोरण स्वीकारले. पोलिसांनी यासंदर्भात चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिले.

हिजाबच्या मुद्द्यावरून सध्या देशात चर्चा सुरू आहे. आम्हाला आमच्या मर्जीप्रमाणे कुठेही हिजाब घालण्यास मिळाला पाहिजे, अशी मागणी कर्नाटकातून पुढे आली. शैक्षणिक संस्थेतही आम्हाला मर्जीप्रमाणे हिजाब घालण्याची परवानगी हवी, अशी या महिलांची मागणी आहे. सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे.

Exit mobile version