तामिळनाडूत विषारी दारू प्यायल्याने २५ जणांनी गमावला जीव

अवैध दारूविक्रेता के. कन्नुकुट्टी याला अटक

तामिळनाडूत विषारी दारू प्यायल्याने २५ जणांनी गमावला जीव

तामिळनाडूमधील कल्लाकुरिची जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने काही जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विषारी दारू प्यायल्यामुळे २५ जणांचा मृत्यू झाला असून ६० हून अधिक जण रुग्णालयात दाखल आहेत. कल्लाकुरिचीचे जिल्हाधिकारी एम एस प्रशांत यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. शिवाय ,मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याप्रकरणी ४९ वर्षीय अवैध दारूविक्रेता के. कन्नुकुट्टी याला अटक करण्यात आली आहे.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरूल पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “कल्लाकुरिचीमध्ये भेसळयुक्त दारू पिणाऱ्या लोकांच्या मृत्यूची बातमी ऐकून मला मोठा धक्का बसला आणि दु:ख झालं. या प्रकरणात सहभागी असलेल्यांना अटक करण्यात आली आहे. ते रोखण्यात अपयशी ठरलेल्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे.”

याप्रकरणी के. कन्नुकुट्टी याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या सुमारे २०० लीटर अवैध दारूची चाचणी केली असता त्यात प्राणघातक ‘मेथनॉल’ असल्याचे स्पष्ट झालं आहे.

हे ही वाचा..

हरमन, स्मृतीची शतके; थरारक सामन्यात शेवटच्या चेंडूवर भारताची दक्षिण आफ्रिकेवर मात

१४ खरिप पिकांना केंद्राकडून किमान आधारभूत किंमत जाहीर; दीडपट मोबदला मिळणार

ऐतिहासिक दोन शतकानंतर गोलंदाजीतही स्मृती मंधानाची कमाल

यूजीसी-नेट परीक्षा रद्द!

अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या लोकांची माहिती जनतेने दिल्यास तत्काळ कारवाई केली जाईल. समाजाला उद्ध्वस्त करणाऱ्या अशा गुन्ह्यांना कठोरपणे आळा घालण्यात येईल. तामिळनाडूचे राज्यपाल आरएन रवी यांनी मृतांबद्दल शोक व्यक्त केला आणि उपचार सुरू असलेले लोक लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली. राज्याच्या विविध भागांतून विषारी दारूच्या सेवनामुळे सातत्याने होणाऱ्या मृत्यूच्या घटनांवर राज्यपालांनी चिंता व्यक्त केली.

Exit mobile version