शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांचा एक व्हीडिओ तोडमोड करून शेअर करत त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकरण चांगलेच पेटले आहे. यासंदर्भात तीनजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटकही करण्यात आली आहे.
शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅलीत सामील झाले होते. या रॅलीतील व्हीडिओ मॉर्फ करुन तो व्हायरल करण्यात आला होता. या व्हीडिओमधून शीतल म्हात्रे यांच्यावर घाणेरडे आरोप करण्यात आले होते तसेच त्यात अश्लिल गाण्याचा उपयोग करून बदनामी करण्यात आली होती.
या व्हीडिओवरुन गेल्या काही तासांपासून राजकारण चांगलंच तापलंय. या प्रकरणात शितल म्हात्रे यांनी पोलिसांत तक्रार नोंदवल्यानंतर अशोक मिश्रा, मानस कुवर, विनायक डायरे या तिघांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटकही करण्यात आली.
हे ही वाचा:
ऑस्कर विजेती ४० मिनिटांची डॉक्युमेंट्री द एलिफन्ट…बनली ४५० तासांच्या फूटेजमधून
सौदी अरेबियात नमाजसाठी लाऊडस्पीकर बंद, या अटी पाळा!
नाटू-नाटू, द एलिफन्ट व्हिस्परर्सने रचला इतिहास, भारताला मिळाले दोन ऑस्कर
आईचा पुसटसा चेहरा पाहिला पण तो शेवटचा!
मात्र या तिघांविरोधात आता बोरिवलीचे आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे याने अब्रुनुकसानीचा दावा करत दहिसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मॉर्फ व्हिडिओ सोशल मिडियावर वायरल करून जनमानसात बदनामी केल्याचा आरोप राज यांनी तक्रारीत केला आहे.
या प्रकरणी दहिसर पोलिस ठाण्यात तीनही आरोपींविरोधात कलम 500,34 भादवि सह कलम 67(अ),67 माहिती तंत्रज्ञान अधिकार 2000 अंतर्गत स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात ठाकरे गटाच्या साईनाथ दुर्गे या युवा कार्यकर्त्यालाही अटक करण्यात आली आहे. त्यामुळे हे प्रकरण इथेच शमणार नसून ते अधिक चिघळेल असे मानले जात आहे.