मनसुख हिरेन हत्या आणि अंटालिया बाहेर स्फोटके पेरल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे, रियाजुद्दीन काझी,पोलीस अंमलदार विनायक शिंदे पाठोपाठ पोलीस निरीक्षक सुनील माने याला देखील पोलिस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
डॅमेज कंट्रोलची गरज ठाकरे सरकारला आहे, भाजपाला नाही
मीरा चोप्रा लसीकरण प्रकरण, कंपनीचे कंत्राट रद्द करण्याची भाजपाची मागणी
मेहुल चोक्सीला भारतात आणण्यासाठी ८ सदस्यीय टीम डोमिनिकामध्ये
पोलीस निरीक्षक सुनील माने याच्या बडतर्फीचा आदेश मंगळवारी मुंबई पोलीस आयुक्तांनी काढला आहे. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटालिया या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार पार्क करणे, त्यानंतर या कारचा मालक मनसुख हिरेन याची हत्या केल्याप्रकरणी , तसेच पुरावे नष्ट केल्याप्रकरणी एनसीबीने सीआययु चे तत्कालीन प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे, रियाजुद्दीन काझी, पोलीस निरीक्षक सुनील माने, निलंबित पोलीस अंमलदार विनायक शिंदे आणि एक खाजगी इसम नरेश गोर यांना अटक केली आहे. हे सर्व आरोप सध्या तळोजा तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहे.
मुंबई पोलीस आयुक्त यांनी स्वतःचे विशेष अधिकार वापरून सचिन वाझेसह रियाजुद्दीन काझी यांना दोन आठवड्यापूर्वीच पोलीस सेवेतून बडतर्फ केल्याचा आदेश जारी केला होता. दरम्यान गेल्या आठवड्यात पोलीस अंमलदार विनायक शिंदे याला बडतर्फ करण्यात आले होते. मंगळवारी पोलीस निरीक्षक सुनील माने याच्या बडतर्फीचा आदेश पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी जारी केला आहे. सुनील माने याने सचिन वाझेला या गुन्हयात मदत करून गुन्ह्यातील पुरावे नष्ट करण्याची मदत केली होती. याप्रकरणी माने याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणातील चारही पोलिसांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.