अभिनेत्री लैला खानसह पाच जणांची हत्या प्रकरणी सत्र न्यायालयाने लैला खान हिचा सावत्र पिता परवेज टाक याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. २०११ मध्ये अभिनेत्री लैला खान, तिची आई आणि चार भावंडाची नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील टेकडीवर असलेल्या बंगल्यात हत्या करून मृतदेह पुरण्यात आले होते. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सचिन पवार यांनी ९ मे रोजी परवेज टाकला भारतीय दंड संहिते अंतर्गत इतर गुन्ह्यांसह खून आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते.शुक्रवारी त्याच्या शिक्षेचा निर्णय घेण्यात आला.
आरोपी परवेज टाक हे लैला खानची आई सेलिना हिचा तिसरा पती आहे.फेब्रुवारी २०११ मध्ये महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील त्यांच्या बंगल्यावर अभिनेत्री, तिची आई आणि तिच्या चार भावंडांची हत्या करण्यात आली होती. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी परवेज टाकला अटक केल्यानंतर काही महिन्यांनंतर ही हत्या उघडकीस आली. पीडितांचे कुजलेले मृतदेह नंतर बंगल्यातून बाहेर काढण्यात आले.
काश्मीरचा रहिवासी आणि लैला खानची आई शेलिना हिचा तिसरा पती, याला ८ जुलै २०१२ रोजी अटक करण्यात आली. हत्येनंतर चौदा वर्षांनी, न्यायालयाने अलीकडेच त्याला लैला (३०) आणि तिची मोठी बहीण आझमिना (३२) आणि जुळ्या भावंडांच्या हत्येबद्दल दोषी ठरवले. आणि इम्रान, २५ , चुलत बहीण रेश्मा आणि शेलिना, ५१ हे कुटुंब फेब्रुवारी २०११ मध्ये मुंबईतून बेपत्ता झाले होते.त्यानंतर शेलिनाच्या दुसऱ्या पतीने ओशिवरा पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. तपासात लैला खान कुटुंबाचे शेवटचे ठिकाण त्यांच्या इगतपुरी फार्महाऊस वर आढळून आले होते.
हे ही वाचा:
पुण्यातील प्रकरण सदोष मनुष्यवधाचे; म्हणून लावले ३०४ कलम!
बांगलादेशी खासदाराच्या शरीराचे तुकडे केले, सुटकेसमध्ये भरले…खुन्याला अटक
भारतीय हवाई कंपनी इंडिगोला पहिल्यांदा झाला फायदाच फायदा!
प्रशांत किशोर त्यांच्या निवडणूकपूर्व अंदाजावर ठाम!
खान कुटूंब बेपत्ता झाल्यानंतर परवेज खान याच्यावर संशयाची सुई गेली होती, कारण खान कुटुंबाला त्याच्या सोबत शेवटचे पाहिले गेले होते आणि तो काश्मीरमधील त्याच्या मूळ गावी पळून गेला होता. त्यानंतर काही दिवसांनी खान यांच्या इगतपुरीतील घराला आग लागली. सेलिनाच्या मालमत्तेवरून झालेल्या वादानंतर त्याची हत्या केली आणि नंतर लैला आणि तिच्या चार भावंडांची हत्या केली.
या खटल्यात परवेज टाक विरुद्ध फिर्यादी पक्षाने ४० साक्षीदार तपासले गेले, त्यानंतर त्याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश सचिन पवार यांनी ९ मे रोजी परवेज टाकला भारतीय दंड संहिते अंतर्गत इतर गुन्ह्यांसह खून आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते. शुक्रवारी त्याच्या शिक्षेचा निर्णय घेण्यात आला, व त्याला फाशीची शिक्षा सुमाविण्यात आली.