इन्व्हेस्टमेंट फ्रॉडच्या नावाखाली फसवणूक करणारा ठग गजाआड

 पश्चिम विभाग सायबर पोलिसांची कारवाई, ३३० बैंक खात्यांमध्ये २.२० कोटी गोठवले

इन्व्हेस्टमेंट फ्रॉडच्या नावाखाली फसवणूक करणारा ठग गजाआड

सोशल मीडियाच्या माध्यमातून गुंतवणूकीच्या आमिषाने (इन्व्हेस्टमेंट फ्रॉड) नागरिकांना गंडा घालणाऱ्या ३७ वर्षीय ठगाला पश्चिम विभाग सायबर पोलिसांनी गजाआड केले आहे. केताब अली काबिल बिस्वास असे आरोपीचे नाव असून तो सांताक्रुझमधील रहिवासी आहे.

जोगेश्वरी पूर्वेतील नटवर नगर रोड परिसरात राहात असलेल्या व्यावसायिक फकरुद्दीन बगसरावाला (७३) यांची गेल्यावर्षी २० मे ते ७ ऑक्टोबर दरम्यान ठगांनी ३ कोटी ६१ लाख ७६ हजार ४२६ रुपयांची फसवणुक केली होती. बगसरावाला यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पश्चिम विभाग सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला. पोलिसांनी गुन्ह्यातील तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास करत सांताक्रूझमधील रहिवासी बिस्वास याला ताब्यात घेत अटक केली आहे.

व्यवसायाने कपड्यांचा कारखाना चालवत असलेल्या बिस्वास याच्याकडील चौकशी आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या दोन बँक खात्यांच्या तपासातून पोलिसांनी विविध बँकांमधील दोन कोटी २० लाख ९९ हजार १३५ रुपये जमा असलेली एकूण ३३० बैंक खाती गोठविली आहेत. त्या आधारे पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हे ही वाचा:

मुख्यमंत्री शिंदेंच्या खोट्या सह्या आणि शिक्यांचा वापर!

‘पदवीधर’वरून सरदेसाई- परब भिडले कोणाचा गेम होणार ?

‘कलम ३७०’ने ५० कोटींचा टप्पा ओलांडला

सिद्धू मूसवालाची आई ५८ व्या वर्षी गरोदर

अशी केली फसवणूक…

व्यावसायिक फकरुद्दीन बगसरावाला यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, कला ऑनचिरा, स्टेला या दोन महिलांसह पॉल ट्युडोर नावाचा व्यक्ती आणि व्हाट्स ऍपच्या सिल्वर गृपवरील अन्य सभासदांनी नियोजन बद्ध कट रचुन त्यांच्याकडून ऑनलाईन पैसे उकळण्यासाठी खोटे ऑनलाईन ऍग्रीमेंट बनवले.

ऍग्रीमेंट खरे असल्याचे भासवुन आरोपींनी त्यांच्याकडून गुंतवणूक घेतली. गुंतवलेली रक्कम नफ्यासह फुगवुन दाखवत त्यांना आणखी पैसे भरण्यास भाग पाडले. फिर्यादी यांनी गुंतवलेल्या रकमेवर नफा दिला नाही. तसेच, ना गुंतवलेली रक्कम परत केली.

Exit mobile version