देशात ‘लव्ह जिहाद’ होतोय; इंडिया टुडे सीव्होटरमध्ये ५३ टक्के लोकांना मान्य

मुस्लिम पुरुष लव्ह जिहादमध्ये सामील असल्याचे मत

देशात ‘लव्ह जिहाद’ होतोय; इंडिया टुडे सीव्होटरमध्ये ५३ टक्के लोकांना मान्य

इंडिया टुडे सीव्होटर मूड ऑफ द नेशन या अंतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून अनेक राजकीय गोष्टींबद्दल अंदाज व्यक्त करण्यात आले आहेतच पण लव्ह जिहादबाबतही मत नोंदविण्यात आली आहेत. त्यात १ लाख ४० हजार ९१७ लोकांची मते जाणून घेण्यात आली. अतिरिक्त १ लाख ५ हजार लोकांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या. त्यात मुस्लिम पुरुष हे लव्ह जिहादमध्ये सामील आहेत, असे ५३ टक्के लोकांचे मत आहे.

एकूण मतदारांमधून ५३ टक्के लोकांना असे वाटते की, लव्ह जिहाद हा प्रकार होतो आहे. त्यात मुस्लिम पुरुष हिंदू महिलांना भुलवून त्यांच्याशी विवाह करतात आणि मग त्यांना धर्मांतरित केले जाते. शिवाय, त्यांचा छळ होतो, त्यांच्यावर अत्याचार होतात मग त्यांची हत्या होते किंवा त्यांना सोडून दिले जाते. डाव्या किंवा तथाकथित पुरोगामींना ही संकल्पनाच अस्तित्वात नाही, असे वाटते. केवळ उजव्या विचारसरणीच्या लोकांमधील हा भ्रम आहे, असा समज ते करून देतात.

हे ही वाचा:

इंडिया टुडे सीव्होटरच्या सर्वेक्षणात मोदी सर्वोत्तम; लोकसभेसाठी महाराष्ट्रात मविआला थेट ३४ जागा

अदाणींचा गेम कोण करतोय? कही पे निगाहे, कही पे निशाना…

सुरक्षा नसल्याचे कारण देत बनिहालमध्ये भारत जोडो यात्रा थांबवली

पंतप्रधानांनी परीक्षांसंदर्भात मुलांशी सुसंवाद साधला ही अभिमानाची गोष्ट!

सध्या लव्ह जिहादचे हे वाढते प्रकार लक्षात घेता. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरयाणा, कर्नाटक या राज्यांत लव्ह जिहादविरोधी कायदा करण्यात आला आहे. देशभरात अनेक ठिकाणी अशा हिंदू मुलींनी फसवून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून धर्मांतरित करणे नंतर त्यांची हत्या किंवा त्यांना सोडून देण्याचे प्रकार होत आहेत.

२०२२च्या अखेरपर्यंत देशभरात जवळपास १५३ अशा घटना घडल्या ज्यात लव्ह जिहादचा थेट संबंध होता. गेल्या वर्षी झालेली आफताब आणि श्रद्धा वालकर यांच्या प्रेमप्रकरणाची घटनाही त्यातच मोडणारी घटना आहे. त्यात आफताबने श्रद्धा वालकरकडून सातत्याने होणाऱ्या लग्नाच्या मागणीनंतर कंटाळून तिची गळा दाबून हत्या केली आणि नंतर तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले. त्या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला. आता या प्रकरणात पोलिसांनी ६ हजार पानी आरोपपत्र दाखल केले आहे.

Exit mobile version