गुजरातमधील बोटाड जिल्हा आणि अहमदाबाद जिल्ह्याच्या लगतच्या भागात बनावट दारू प्यायल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली. पण प्रत्यक्षात रसायन प्यायल्यामुळे हे मृत्यू झाल्याचा खुलासा झाला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गुजरात सरकारने एसआयटीची स्थापना केली आहे. आतापर्यंत या प्रकरणात गावठी दारु बनवणाऱ्या १३ जणांना अटक करण्यात आली आहे.
या दारूकांडात मोठा खुलासा झाला असून, गुजरात पोलिसांनी मोठा दावा केला आहे. लोकांनी दारू प्यायली नसून रसायन प्यायल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी सांगितले की, मारले गेलेले लोक दारू पीत नव्हते तर रसायन प्यायले होते. या प्रकरणी इमॉस कंपनीचा गोडाऊन मॅनेजर जयेश याला पोलिसांनी अहमदाबाद येथून ताब्यात घेतले आहे. इमॉस कंपनी ही मिथाईलच्या व्यवसायाशी संबंधित कंपनी आहे.
अनेक नागरिकांनी मद्यपान केले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वांना पोटदुखी व उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यानंतर काही वेळातच दोघांचा मृत्यू झाला. त्रासामुळे अनेकांना रुग्णलयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर जिल्हा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या शिवाय अलावा उंचडी, चंदरवा, आकरू आणि अनिवारी या गावांतही मृत्यूचे तांडव सुरूच आहे. विषारी दारूने दोन दिवसांत १५ जणांचा बळी घेतला आहे. धक्कादायक म्हणजे अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
हे ही वाचा:
अदानी-रिलायन्सपैकी कोण जिंकणार 5G स्पेक्ट्रमची बोली
“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ही तुमची प्रॉपर्टी नाही ते शिवसैनिकांचे दैवत”
सीएसएमटी स्थानकात लोकलचा डबा घसरला
विश्वासघात…पालापाचोळा…खंजीर…भाजपाचे कारस्थान…पुन्हा तेच; उद्धव ठाकरे यांची मुलाखत
गुजरातचे पोलिस महासंचालक आशीष भाटिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोटाद जिल्ह्यातील मद्य तस्कारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपी दारुची तस्करीकरून ग्रामीण भागात त्याची विक्री करत होते.