गेमिंग ऍप धर्मांतरण प्रकरणी फरार शाहनवाजला पकडले

मुंब्रा पोलिसांनी वरळीत शोध घेतला असता तो अलिबागमध्ये असल्याचे कळले

गेमिंग ऍप धर्मांतरण प्रकरणी फरार शाहनवाजला पकडले

गेमिंग ऍपच्या माध्यमातून धर्मांतरण करण्याचा प्रकार समोर आल्यावर पोलिस एका फरार आरोपीचा शोध घेत होते. तोच बद्दो उर्फ शाहनवाज मकसुद खान (वय २३) याला पकडण्यात आले आहे. अलिबाग येथून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

हा कविनगर पोलिस ठाणे, गाझियाबादचा आरोपी होता. धर्मांतर कायदा कलम 3,5(1) मधील हा आरोपी असून त्याचा शोध घेण्यासाठी वरिष्ठांचे आदेश झाल्यानंतर मुंब्रा पोलिस ठाण्याचे स.पो. नि. कुंभार व पथकाने त्याच्या नातेवाईकांच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केले तेव्हा आरोपी वरळी पोलिस ठाणे हद्दीत असल्याचा सुगावा लागला.   वरळी पोलिसांच्या मदतीने त्याचा शोध घेण्यात आला पण आरोपी आलिबागला पळाला असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानंतर मुंब्रा पोलिस पथक परस्पर अलिबाग येथे रवाना झाले. लॉज कॉटेज चेक करत असताना एका कॉटेजमध्ये असल्याचे माहिती प्राप्त झाल्याने त्यास लागलीच स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले.

आरोपी शाहनवाजकडे कविनगर पोलिस ठाणे गाझियाबादच्या अनुषंगाने चौकशी केली असता आरोपी व धर्मांतरित करण्यात आलेला पीडित मुलगा यांची २०२१ च्या सुरुवातीस Fort Nite या गेमिंग ॲप्लिकेशन वरून ओळख झाली गेम खेळणाऱ्या लोंकाना एकमेकांशी बोलण्यासाठी discod सुविधाच्यां मार्फतीने ओळखीचे रूपांतर मैत्रीत होऊन त्यांनीं एकमेकांचे फोन नंबर घेऊन बोलण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही दिवसांनी गेम खेळणे बंद केले.  २०२१ च्या डिसेंबरअखेर valorant गेम खेळण्यास सुरुवात केली. Valorant गेम खेळत असताना Ice – Box या टार्गेटच्या ठिकाणीं पोचले असता दोघांमध्ये पहिल्यांदा धर्मांतर विषयावर बोलणे झाले व झाकीर नाईक यानी केलेल्या भाषणावर चर्चा झाली.

हे ही वाचा:

सतत रडणे,गप्प गप्प राहणे; ओडिशा अपघातातील जखमी मनोविकाराने ग्रस्त

ऑस्ट्रेलियाने जिंकले पहिले कसोटी अजिंक्यपद

ठीक वर्षापूर्वी मविआची भाकरी करपली होती, आज अजित पवारांची करपली!

शुभमन गिलला ढापला?

आरोपी हा त्याचे राहते घरी असलेल्या कम्प्युटरवरून गेम खेळत होता. त्याच्याजवळ एक One Plus मोबाईल आहे. आरोपीचे घरी एक I- Pad, कॉम्प्युटर आहे. आरोपीचा व्हॉट्सॲप नंबर असून नावाने इंस्टाग्राम अकाउंट आहे. या धर्मांतरणात ४०० जणांचे धर्मांतरण करण्यात आल्याचा संशय आहे. मुंब्र्याशी या सगळ्या प्रकाराचे कनेक्शन असल्याचा संशय आहे.

Exit mobile version