धाराशिवमध्ये दोन गटात राडा; १२५ हून अधिक जणांवर गुन्हा दाखल

धाराशिवमध्ये दोन गटात राडा; १२५ हून अधिक जणांवर गुन्हा दाखल

धाराशिव शहरात सोमवार, २५ मार्च रोजी दोन गटात जोरदार राडा झाल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. खाजा नगर आणि गणेश नगर भागात हा प्रकार घडला आहे. या गटात राडा झाल्यानंतर दगडफेक झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी आश्रूधुराच्या तीन नळकांडया फोडत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. घटनास्थळी सध्या परिस्थिती नियंत्रणात असून तणाव निवळला आहे. तसेच, परिस्थिती पूर्वपदावर आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. एका युट्यूब चॅनलच्या पत्रकारामुळे जमाव भडकल्याचा आरोप करण्यात येत असून, त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

धाराशिव शहरात सोमवारी रात्री दोन गटात वाद झाला आणि वादाचे रुपांतर पुढे हाणामारीत झाले. यावेळी दगडफेकही झाली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्वतः पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी घटनास्थळी पोहचले होते. यावेळी पोलिसांकडून जमावाला पांगवण्यासाठी आश्रूधुराच्या तीन नळकांडया फोडण्यात आल्या.

हे ही वाचा:

ओम बिर्ला यांना टक्कर देण्यासाठी प्रल्हाद गुंजाळ मैदानात!

बंगळूरूमध्ये पाण्याचा अपव्यय करणाऱ्या २२ नागरिकांना लाखोंचा दंड

काँग्रेसच्या सहाव्या यादीतून पाच उमेदवार जाहीर

केजरीवालनी खलिस्तानी चळवळीला मदत करण्याचे आश्वासन दिले होते!

दोन गटातील वादानंतर पोलिसांनी कारवाईला सुरवात केली आहे. धाराशिव शहरात झालेल्या राड्यानंतर धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ३०७ आणि इतर कलम अंतर्गत जवळपास १२५ पेक्षा जास्त जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच, तिघांना अटक करण्यात आली आहे. तर, दगडफेकीच्या घटनेत काही वाहनांचे, दुकानांचे नुकसान झाले आहे. पोलिसांकडून नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका यु ट्यूब चॅनलच्या पत्रकाराला देखील अटक केली आहे. त्याच्यावर जमाव भडकवल्याचा आरोप असून, अल्ताफ शेख असे त्याचे नाव आहे.

Exit mobile version