27.9 C
Mumbai
Saturday, April 12, 2025
घरक्राईमनामामहाकुंभात महिलांचे स्नान करतानाचे व्हिडीओ युट्युबवर अपलोड प्रकरणी; तिघांना अटक

महाकुंभात महिलांचे स्नान करतानाचे व्हिडीओ युट्युबवर अपलोड प्रकरणी; तिघांना अटक

महाराष्ट्रातील दोघांचा समावेश

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे आयोजित महाकुंभात महिलांचे स्नान करतानाचे व्हिडीओ बनवून ते डार्कवेबवर विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अहमदाबाद गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. तीन जणांना ताब्यात घेण्यात आले असून विशेष म्हणजे यात महाराष्ट्रातील दोन तरुणांचा समावेश आहे.

महाकुंभात महिलांचे स्नान करतानाचे व्हिडीओ युट्युबवर अपलोड करण्यात आले होते. या प्रकरणाच्या तपासादरम्यान महिलांचे आक्षेपार्ह फुटेज आढळून आले. दरम्यान, अहमदाबाद पोलिसांनी एका युट्युबरसह तिघांना आतापर्यंत अटक केली आहे. अहमदाबाद सायबर क्राईमच्या डीसीपी लविना सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित तिघांनी महाकुंभात स्नान करणाऱ्या महिलांचे व्हिडिओ इतर चॅनेलनाही विकले होते. ते चढ्या दराने व्हिडिओ विकण्याचा व्यवसाय चालवत होते, हे तपासात समोर आले आहे.

संशयित आरोपींची ओळख पटली असून, त्यांची नावे चंद्रप्रकाश फूलचंद (प्रयागराज), प्रज्ज्वल अशोक तेली (लातूर, मूळ जत, सांगली) आणि प्रांज पाटील (चिखली, शिराळा) येथील आहेत. अहमदाबाद गुन्हे शाखेच्या तपासात असे दिसून आले की, हे तिघेही आरोपी महाकुंभात आंघोळ करणाऱ्या महिलांचे व्हिडिओ यूट्यूब आणि टेलिग्राम चॅनेलवर विकत होते. त्या बदल्यात पैसे मिळवत होते. प्रयागराजमधील आरोपीच्या चॅनेलवर महाकुंभमेळ्याचे व्हिडिओ आढळले.

शिवाय तपासात असे दिसून आले आहे की, लातूर जिल्ह्यातील प्रणव तेली हा आरोपी या प्रकरणात परदेशी हॅकर्सच्या संपर्कात होता. आरोपी असलेले सर्वजण टेलिग्रामवर वेगवेगळे अकाउंट तयार करून आणि काही टेलिग्राम अकाउंटचे सदस्यत्व २ हजार ते ४ हजार रुपयांमध्ये मिळवून या व्हिडिओंसाठी पैसे कमवत होते. प्रयागराजमधील कुंभमेळ्यात महिलांचे स्नान करतानाचे अर्धनग्न व्हिडिओ परदेशी हॅकर्सनी बनवले आणि डार्क वेबवर पोस्ट केले. याशिवाय आरोपींनी गुजरात, महाराष्ट्रातील हॉस्पिटल मॉलमधील महिलांचे व्हिडिओ बनवून पोस्ट केले. लातूरमधून पैशांच्या व्यवहाराची लिंक सापडली असून आरोपीच्या खात्यात परदेशातून पैसे आल्याची माहिती गुजरात पोलिसांना मिळाली आहे.

हे ही वाचा : 

कर्नाटकात महाराष्ट्राच्या एसटी बससह चालकाला फासले काळे; कन्नड बोलण्याची सक्ती

अमेरिकेच्या एफबीआय संचालकांनी भगवद्गीतेवर हात ठेवून घेतली शपथ!

यूएसएआयडीच्या माध्यमातून देशाच्या अंतर्गत बाबींमध्ये परकीय हस्तक्षेपाचे अहवाल चिंताजनक

छत्रपती संभाजी महाराजांबद्दल विकिपीडियावर वादग्रस्त लिखाण; लेखकांवर दाखल होणार गुन्हा

कारवाई दरम्यान अहमदाबाद गुन्हे शाखेने महाराष्ट्रातून तेली आणि पाटील यांना; तर चंद्रप्रकाश याला प्रयागराज येथून अटक केली. आरोपींची अजूनही चौकशी सुरू आहे. हे व्हिडिओ त्यांनी स्वतः अपलोड केले आहेत की कोणाकडून खरेदी केले आहेत, याची चौकशी केली जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
241,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा