26 C
Mumbai
Tuesday, December 31, 2024
घरक्राईमनामा'बुल्ली बाई' ऍपप्रकरणी इंजीनियरिंगच्या विद्यार्थ्याला घेतले ताब्यात

‘बुल्ली बाई’ ऍपप्रकरणी इंजीनियरिंगच्या विद्यार्थ्याला घेतले ताब्यात

Google News Follow

Related

बुल्ली बाई ऍपप्रकरणात मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने बेंगळुरू येथून इंजीनियरिंगच्या २१ वर्षीय विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे.

मुंबई पोलिसांनी त्याची ओळख अद्याप जाहीर केलेली नाही. केवळ त्याचे वय किती हे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. आयपीसी व आयटी कायद्याअंतर्गत पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

गिटहबच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या बुल्ली बाई या ऍपमधून मुस्लिम महिलांची छायाचित्रे अपलोड करून त्या महिलांच्या विक्रीच्या ऑफर देण्यात येत होत्या. त्यानंतर रविवारी मुंबई सायबर पोलिसांनी बुल्ली बाई ऍपच्या निर्माते व ट्विटर हँडलरविरोधात एफआयआर दाखल केला.

अज्ञात इसमांविरुद्ध १५३ (ए; धर्माच्या नावावर गटागटांत शत्रुत्व निर्माण करण्यासाठी) १५३ (बी, देशाच्या एकात्मतेला धक्का पोहोचविल्याबद्दल), २९५ (ए, जाणीवपूर्वक धार्मिक भावना दुखावणे), ३५४ (डी, पाठलाग करणे), ५०९ (शब्द, हावभाव व कृतीच्या माध्यमातून महिलांच्या प्रतिष्ठेचा अवमान करणे), ५०० (बदनामी) आणि कलम ६७ (इलेक्ट्रॉनिक माध्यमातून अश्लिल साहित्याचा प्रसार करणे) अशी कलमे माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत लावण्यात आली आहेत.

दिल्ली आणि मुंबईत यासंदर्भात एफआयआर दाखल झाल्यानंतर केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिल्ली व मुंबईतील पोलिसांसह केंद्र सरकार यासंदर्भात पुढील तपास करत असल्याचे सांगितले.

हे ही वाचा:

मंदिराच्या दारात लटकवले गोमांस

डाव्याच नव्हे तर उजव्या एनजीओंचेही परवाने रद्द

मोदींची गाडी, विरोधक अनाडी

तालिबानचे दारू’बॅन’; कालव्यात ओतले हजारो लीटर मद्य

 

१ जानेवारीला हे ऍप सोशल मीडियाच्या व्यासपीठावर उपलब्ध झाले होते आणि त्यात पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्या, विद्यार्थी व प्रसिद्ध व्यक्ती अशा मुस्लिम महिलांचे फोटो अश्लिल मजकुरासह होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा