आसाम पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई केली आहे. आसाममधील कामरूप जिल्ह्यातून पोलिसांनी सुमारे ६ कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त केले आहे. यासोबतच पोलिसांनी दोन तस्करांनाही अटक केली आहे.
पोलिसांनी यासंदर्भात रविवारी (२० ऑक्टोबर) माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की, दोन गाड्यांमधून ड्रग्जची तस्करी केली जात होती, त्या गाड्या देखील ताब्यात घेण्यात आल्या आहेत. या प्रकरणी कायदेशीर कारवाई सुरु करण्यात आली आहे.
आसामचे पोलिस मुख्य जनसंपर्क अधिकारी प्रणबज्योती गोस्वामी यांनी एका निवेदनात सांगितले की, गुप्त माहितीच्या आधारे स्पेशल टास्क फोर्सच्या (एसटीएफ) पथकाने शनिवारी (१९ ऑक्टोबर) रात्री अमीनगाव परिसरात कारवाई केली आणि मणिपूरमधून येणारे ड्रग्स जप्त केले. ६ कोटी रुपयांचे ६३७ ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. शेजारच्या राज्यातील कांगपोकपी जिल्ह्यातून ट्रकमध्ये भरून हे ड्रग्ज आणण्यात आले होते. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.
हे ही वाचा :
सोमवारी पिंपरीत होणार ब्राह्मण सामर्थ्य संमेलन
नागपूरमधून फडणवीस, कांदिवली पूर्वमधून भातखळकर, वांद्रेमधुन आशिष शेलार तर मुलुंडमधून मिहीर कोटेचा!
नसीब चौधरीच्या घरावर अखेर बुलडोजर !
सरन्यायाधीश म्हणाले, ‘अयोध्येच्या निकालावेळी मी देवांपुढे बसून प्रार्थना केली’
In an anti-narcotics operation carried out by @STFAssam, 637gms of heroin worth ₹6 crore were recovered in Amingaon.
Two people have been apprehended in this connection.
Good job @assampolice #AssamAgainstDrugs pic.twitter.com/IW8O39ZZwn
— Himanta Biswa Sarma (@himantabiswa) October 20, 2024