कांडला बंदर हेरॉईन प्रकरणातील आयातदाराला अटक

कांडला बंदर हेरॉईन प्रकरणातील आयातदाराला अटक

गुजरात येथील कांडला बंदरात सापडलेल्या हेरॉईन प्रकरणात आता एक मोठी घडामोड घडली आहे. या प्रकरणात तपस यंत्रणांना यश आले असून या प्रकरणातील आयातदाराला अटक करण्यात आली आहे. महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने कारवाई करत ही अटक केली आहे.

गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) अधिकार्‍यांबरोबर संयुक्तपणे विकसित केलेल्या माहितीच्या आधारे, महसूल गुप्तवार्ता संचालनालयाचे (डीआरआय) अधिकारी सध्या कांडला बंदर इथे उत्तराखंड स्थित कंपनीने आयात केलेल्या मालाची तपासणी करत आहेत. इराणच्या अब्बास बंदरातून ही खेप कांडला बंदरात आली होती. १७ कंटेनर (१०३१८ बॅग) मधून आयात केलेल्या मालाचे एकूण वजन ३९४ मेट्रिक टन आहे आणि ती “जिप्सम पावडर” असल्याचे सांगितले जात होते. तर आतापर्यंत १४३९ कोटी रुपये किंमतीचे २०५.६ किलो अवैध हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. मालाची सखोल तपासणी अजूनही बंदरात सुरू आहे.

हे ही वाचा:

फ्रान्सची सूत्रे पुन्हा मॅक्रोनच्याच हाती

जातीवरून हिणवत छळ केल्याचा नवनीत राणांचा आरोप

राणांच्या घरात घुसू पाहणाऱ्या शिवसैनिकांना एका दिवसात जामीन

राणा दाम्पत्यांना एका प्रकरणात दिलासा

तपासादरम्यान, आयातदार उत्तराखंडमधील नोंदणीकृत पत्त्यावर सापडला नाही. त्यामुळे आयातदाराला पकडण्यासाठी देशभरात मोहीम सुरू करण्यात आली. आयातदाराचा ठावठिकाणा शोधण्यासाठी डीआरआयने भारतभर विविध ठिकाणी छापे टाकले. ओळख टाळण्यासाठी आयातदार सारखी ठिकाणे बदलत होता आणि लपत होता. मात्र अखेर सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आले आणि पंजाबमधील एका लहान गावात हा आयातदार सापडला. आयातदाराने प्रतिकार करून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी त्याला पकडले आहे.

आतापर्यंत केलेल्या चौकशीच्या आधारे, डीआरआयने या  आयातदाराला एनडीपीएस  कायदा, १९८५ च्या तरतुदींअंतर्गत अटक केली  आणि त्याला 24-04-2022 रोजी अमृतसरच्या विशेष दंडाधिकारी  यांच्या  न्यायालयात हजर करण्यात आले. डीआरआय अधिकाऱ्यांना या आयातदाराला भुज येथील न्यायालयासमोर हजर करता यावे यासाठी न्यायालयाने ट्रान्झिट रिमांड मंजूर केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Exit mobile version