कागदावर बांधल्या ४२ झोपड्या

कागदावर बांधल्या ४२ झोपड्या

मुंबईतील प्रभादेवीमध्ये एसआरए प्रकल्पांतर्गत तब्बल ४२ बोगस झोपडीधारक निदर्शनास आलेले आहेत. प्रभादेवीमधील कामगार नगरमध्ये मुंबादेवी एसआरए योजना प्रस्तावित असून, या योजनेसाठी झोपडीधारकांचे सर्वेक्षण सुरू आहे. हेच सर्वेक्षण सुरु असताना यामध्ये ४२ बोगस झोपडीधारकांची नावे घुसवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

त्या जागेवर झोपड्या नसतानाही कागदोपत्री मात्र झोपड्या उगवल्या होत्या. मुख्य म्हणजे झोपड्या आहेत असे झोपडीधारकांना पात्र ठरवून २९ जानेवारी २०१६ रोजी पालिकेच्या जी दक्षिण विभाग कार्यालयाकडून परिशिष्ट-दोन मंजूर केले होते. एसआरए प्रकल्पात बोगस झोपडीधारकांची संख्या वाढल्यास बिल्डरला एफएसआयचा लाभ मिळतो. त्या हेतूने बोगस नावे घुसवण्यात आली होती. त्यामुळेच आता शिवसेनेचे नगरसेवक यांनी पालिकेला घरचा आहेर दिलेला आहे. शिवसेनेचे नगरसेवक समाधान सरवणकर यांनी मूळ झोपड्या जागेवर नसताना त्या पात्र ठरवून त्यांचा योजनेत समावेश कसा करण्यात आला, सवाल करत पालिकेकडे तक्रार केली.

प्रत्यक्षात झोपड्या अस्तित्वात नसताना, सरकारी कागदावर मात्र झोपडीची नोंद होती. त्यामुळेच आता महापालिका अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने ४२ झोपड्यांबाबत हा चमत्कार घडलेला होता. परंतु हे प्रकरण अंगाशी येईल हे ओळखून धावपळ करून या बोगस झोपडीधारकांची नावे परिशिष्ट-दोनमधून (अनेक्सर-२) वगळण्यात आली आहेत.

हे ही वाचा:

गोवंश टिकवा, संस्कृती टिकवा!

कोकणातील महापुरात उद्योग गेला वाहून

अतिक्रमणे हटवा, गांधी मैदान वाचवा!

माळशेज, भंडारदरा, राजमाजीत गर्दीचे धबधबे

सदर प्रकरणी सरवणकर यांनी जी दक्षिण विभाग कार्यालयातील वरिष्ठ वसाहत अधिकारी जितेंद्र वाघमारे, वसाहत अधिकारी दिनेश राठोड, भाडे संकलक हिरासिंग राठोड, सायली बर्डे यांनी झोपडपट्टीत जाऊन पाहणी केली. त्यावेळी प्रत्यक्ष जागेवर एकही झोपडी आढळली नाही. सरवणकर यांनी १२ ऑगस्ट रोजी झालेल्या पालिका सभागृहाच्या बैठकीत याबाबत प्रश्न विचारला होता. त्यावर पालिका प्रशासनाने दिलेल्या लेखी उत्तरात झोपड्या बोगस असल्याचे पालिका प्रशासनाने मान्य केले होते. घडलेल्या या धक्कादायक प्रकाराबद्दल अजूनही कुणावरही कारवाई करण्यात आलेली नाही.

Exit mobile version