24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामानवी मुंबई विमानतळाच्या परिसरात उभारलेला अनधिकृत दर्गा जमीनदोस्त

नवी मुंबई विमानतळाच्या परिसरात उभारलेला अनधिकृत दर्गा जमीनदोस्त

एक एकरची जमीन केली होती हडप, हिंदु जनजागृती समितीच्या लढ्याला यश

Google News Follow

Related

हिंदु जनजागृती समितीने सातत्याने दिलेल्या या लढ्याला मोठे यश आले आहे. नवी मुंबईत विमानतळाच्या जवळ उभारण्यात आलेल्या अनधिकृत दर्ग्यावर हातोडा पडला आहे. त्यासोबत असलेली इतर अनधिकृत बांधकामेही जमीनदोस्त करण्यात आली आहेत. हिंदू जनजागृती समितीच्या वतीने या अनधिकृत दर्ग्यासंदर्भात पाठपुरावा करण्यात आला होता. अखेर शासनाने गंभीर दखल घेत ही निष्कासनाची कारवाई केली.

नवी मुंबईतील विमानतळाच्या जवळ असलेल्या टेक़डीवरील अनधिकृत दर्गाचे फोटो काही दिवसांपूर्वी व्हायरल झाले होते. अत्यंत मोक्याच्या जागी हा दर्गा उभा राहिला असल्याचे त्यात दिसत होते. सॅटेलाइट इमेजमध्येही मोठी जागा या दर्ग्यासाठी व्यापली असल्याचे दिसत होते. २०१२ ते २०२४ या काळात तिथे मोठे बांधकाम झाल्याचे फोटो प्रणव जाधव यांनी एक्सवर पोस्ट केले होते.

जाधव यांच्या पोस्टमध्ये सॅटेलाइट इमेजच्या सहाय्याने हे अनधिकृत बांधकाम दाखवले असून २०१२ला तिथे केवळ एक मजार बांधण्यात आली आणि आता तिथे मोठे बांधकाम झालेले आहे, हे त्या प्रतिमेतून स्पष्ट होते. प्रारंभी १२ वर्षांपूर्वी केवळ एक दगड ठेवण्यात आला आणि नंतर त्याते मजार, दर्ग्यात रूपांतर झाले असल्याचे दिसत होते.

किल्ले विशाळगड, किल्ले कुलाबा, किल्ले लोहगड, किल्ले वंदनगड, किल्ला शिवडी आदींवर अशाच पद्धतीची अतिक्रमणे झाल्याचे समोर आले आहे. मात्र त्यासंदर्भात पुरेशी कारवाई झालेली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गड-दुर्गांवरील अशी सर्व अनधिकृत बांधकामे हटवणे आवश्यक आहे. हिंदु जनजागृती समितीने ही सातत्याने मागणी लावून धरल्यामुळे माहीम किल्ल्यावरील अनधिकृत बांधकामे हटवण्यात आले; मात्र आज राज्यातील ३५ महत्त्वाच्या गड-दुर्गांवरील अशी अनधिकृत बांधकामे झाल्याचे स्वत: राज्य पुरातत्त्व विभागाचे म्हणणे आहे. किल्ले प्रतापगड, माहीम किल्ला आणि नवी मुंबई येथील अनधिकृत बांधकामे ज्या पद्धतीने हटवण्यात आली. त्याच राज्यातील ३५ महत्त्वाच्या गड-दुर्गांवरील अशी अतिक्रमणे हटवण्यासाठी तातडीने शासनाने पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

पाकिस्तानमध्ये शिया मुस्लिमांना घेवून जाणाऱ्या वाहनावर हल्ला, ५० जण ठार!

अखिलेश यादवांनी खोटा व्हिडीओ केला शेअर

भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांचा राहुल गांधींवर जोरदार प्रहार

महायुतीला स्पष्ट बहुमत, १७५ जागा मिळतील!

नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला, तसेच राष्ट्रीय सुरक्षेला या अनधिकृत दर्ग्यामुळे धोका निर्माण झाला होता. वर्ष २०१२ मध्ये चार दगडांना पांढरे आणि हिरवे रंग देण्यात आले होते. आज वर्ष २०२४ मध्ये त्यांनी एक एकरची मालमत्ता बळकावली होती. झाडाखाली चार पांढर्‍या रंगाच्या दगडांनी कंपाऊंड, कारंजे, घुमट, पाण्याच्या टाक्या, आऊटहाऊस, गेस्ट हाऊस आणि पार्किंग असलेला मोठा दर्गा बनला होता. या सगळ्या बांधकामाविषयी चिंता व्यक्त केली जात होती. त्याविरोधात समितीने पहिली तक्रार मार्च २०२३ मध्ये, तर दुसरी तक्रार ऑक्टोबर २०२४ मध्ये दिली होती. त्या वेळी हिंदु जनजागृती समितीचे मुंबई जिल्हा समन्वयक बळवंत पाठक, समितीचे महेश लाड आणि पत्रकार विजय भोर यांनी सिडकोच्या दक्षता अधिकार्‍यांची भेट घेतली होती. त्यावर सिडकोकडून कारवाई करण्यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. सदर अनधिकृत बांधकाम निष्कासित करून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसराची सुरक्षा सुनिश्चित झाली आहे, त्याप्रमाणे राज्यातील गड-किल्ल्यांवर अनधिकृत बांधकामे हटवून तेथील पावित्र्य आणि संस्कृती आबाधित राखावी, असे समितीने म्हटले आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा