एफडीएने अवैध औषधांची तपासणी सुरू केल्याने जिम घामाघुम

एफडीएने अवैध औषधांची तपासणी सुरू केल्याने जिम घामाघुम

शहरामध्ये अमली पदार्थांचे जाळे हे मोठ्या प्रमाणावर पसरत आहे. याचाच परिणाम की काय आता मोठमोठ्या जिममध्ये अवैध औषध विक्री जोरात सुरू आहे. त्यामुळेच आता मुंबईतील जिम रडारवर आलेली आहेत. जिम मधील अवैध औषध विक्री विरोधात अन्न व औषध प्रशासनाने कडक पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईतील उच्चभ्रू वस्तीमधील जिमच्या तपासण्या सुरू करण्यात आल्या आहेत. शिवाय लवकरच विशेष मोहीम आखून जिमच्या तपासण्या करण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त डॉ. डी.आर.गहाणे यांनी म्हटले आहे.

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर जिममधील अवैध औषध विक्रीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासनाकडे या विरोधात काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींची दखल घेण्यात आली आहे. मुंबईतील जिम मधील अवैध उत्तेजक द्रव्य विक्रीची तपासणी सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिममध्ये जाणाऱ्या तरुणांचा कमी दिवसात आकर्षक शरीरयष्टी बनवण्याकडे कल असतो. यासाठी जिम मधील प्रशिक्षकांकडून ‘सप्लिमेंट फूड’चा मारा केला जातो. तरुणांना प्रोटीन पावडर आणि स्टेरॉईड दिले जाते. याचा तरुणांच्या शरीरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबईतील काही जिम च्या तपासण्या केल्या आहेत.

हे ही वाचा:

श्रीगणेशाच्या मूर्ती छोट्या; पण खरेदीचा आलेख उंचावला

ग्रेट!! भारतीय विमानसेवेत दाखल होणार ३५० विमाने

खाजखुजली आणि बिस्कीट वापरणारे चोरटे गजाआड!

आता घरबसल्या काढता येणार बसचे तिकीट

प्रत्यक्ष जिम मध्ये होत असलेल्या औषध विक्रीची तपासणी करण्यात येत आहे. शिवाय अनेक खासगी प्रशिक्षक औषधांचा वापर करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यासाठी कारवाईची विशेष मोहीम आखली जात आहे. अभिनेते सिद्धार्थ शुक्लांच्या मृत्यूनंतर काही तक्रारी प्राप्त झाल्या. त्याची दखल घेण्यात आली असून आयुक्तांच्या निर्देशाप्रमाणे विशेष मोहीम राबवून अवैध औषध विक्रीवर कडक कारवाई करणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त डॉ. डी.आर. गहाणे यांनी म्हटले आहे

Exit mobile version